वणी : दिंडोरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या पावसामुळे भात लावणीस वेग आला आहे. पारंपरिक पद्धतीने भाताचे उत्पादन घेणारे उत्पादक अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाची जोड उत्पादनासाठी देऊ लागले आहेत. विविध जातींच्या भाताचे उत्पादन घेण्याकडे उत्पादकांचा कल आहे. पूर्वी मर्यादित जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत; मात्र काही वाण आता कालबाह्य झाले असून, अधिक उत्पादन कमी श्रमात देणारे व रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा वाणांचे उत्पादन घेण्यास उत्पादक अग्रकम देत आहेत. भातोडे, मुळाणा, बाबापूर, संगमनेर, धरमबरडा, अंबानेर, सागपाडा, अस्वलीपाडा कोशिबा, पांडाणे वारे, टिटवे, करंजखेड, एकलहरा, चौसाळे, टाक्याचा पाडा, अहिवंतवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. सध्या वरु णराजाने दमदार आगमन केल्याने भात लावणीच्या कामास वेग आला असून, मजुरांना मागणी वाढली आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काही भागात भात प्रमुख पीक आहे.
दमदार पावसामुळे भात लावणीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 7:49 PM