शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दाट धुक्यामुळे बळीराजांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 9:21 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजांची चिंता वाढली : दिंडोरी तालुक्याला माथेरानचे स्वरूप

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासुन दाट धुके पडत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी व पाणी मिश्रित दाट धुके हे रब्बी हंगामातील नवीन समीकरण तयार झाल्याने पिके कशी वाचवयचे ही समस्या आ वासुन उभी राहिली आहे.२०१४-१५ या वर्षी अशाच स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ही वेळेस रब्बी हंगामाच होता. तेव्हा गहु, हरभरा, ऊस, कांदा व इतर नगदी पिके पुर्णपणे नष्ट झाली होती.त्यामुळे बळीराजांवर आर्थिक संकट कोसळले होते. दिवसेंदिवस वातावरणातील बदल हा शेतकरी वर्गाच्या प्रगतीला खिळ घालत असल्यामुळे शेती करणे शेतकरी वर्गाला एक प्रकारे आवाहन ठरत आहे. वातावरणातील बदल जर असाच होत राहिला तर बळीराजां कर्जाच्या डोंगरांला बाहेर पडू शकत नाही. असे विचार सध्या जाणकार शेतकरी वर्गातुन व्यक्त केले जात आहे.रब्बी हंगामाच्या सुरुवातील पोषक वातावरण होते. परंतु नंतर मात्र पेरण्या संपल्यानंतर व उगवण प्रक्रिया मध्यांवर आल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर वातावरणातील बदलावाचे गडद अस्मानी संकट निर्माण झाल्याने मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा बळीराजां आता यामुळे चारी मुंड्या चित होतो कि काय ? अशी भीती दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटु लागली आहे.खरीप हंगाम कोरोनामुळे व परतीच्या पावसाने वाया गेला. त्यामुळे जवळचे सर्वच भांडवल संपून गेलेले असतांना मिळेल त्या ठिकाणीहुन भांडवल उभे करत रब्बी हंगामावर अपेक्षा एकवटून कंबर खचलेल्या बळीराजाला बदलत्या वातावरणाचा व दव आणि दाट धुक्याचा परिणाम होऊ नये म्हणून दिवस रात्र एककरून रब्बी पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.त्यात दिवसा वीज बंद व रात्री वीज चालू या धोरणामुळे शेतकरी वर्गाची डोके दुखी अजूनच वाढत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात बिबट्या वाघ व भुरट्या चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्ग संकटांच्या दरीत सापडला आहे.तालुक्यात सध्या दव आणि दाट धुके पडत असल्यामुळे त्यांचा परिणाम द्राक्षे, कांदा , टमाटा, ऊस व सर्व प्रकारचा भाजीपाला व इतर नगदी पिके यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव रूपाने दिसत आहे. त्यात करपा, मिलीबग, चिकटा, डावणी, घडांना तडे जाणे, घडामध्ये पाणी थांबल्याने घड कुंजण्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच खर्च जास्त व उत्पन्न कवडी मोल हे उलटे समीकरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल झाला आहे.बळीराजांला सध्या टमाटा पिकांने चांगली साथ दिली आहे. टमाट्यामुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी थोड्या फार प्रमाणावर हात भार लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग तग धरून आहे. पण आता या दाट धुके व वातावरणातील बदलाव यांचा नगदी भांडवल मिळुन देणाऱ्या टमाटा पिकांवर होत असल्यामुळे बळीराजांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. (२० लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी