नाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के यहां बॉम्ब रखा हैं’ अशी धमकी तालुका पोलिसांना गुरुवारी (दि.१९) अज्ञाताकडून दूरध्वनीवर मिळाली; मात्र पोलिसांनी सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करत चार तास परिसर पिंजून काढला. मात्र धोकादायक वस्तू आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.गंगापूर धरण सुमारे ७८ टक्के भरले असून, धरणातून नाशिकला पाणीपुरवठा होतो. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत पोलिसांनी दूरध्वनीवर आलेल्या अज्ञात धमकीकडे दुर्लक्ष करणे पसंत केले नाही. तत्काळ बॉम्ब शोधक-नाशक पथकाला याबाबत सूचित करून गंगापूर धरणाचा परिसर गाठला. ७ वाजता तालुका पोलीस व बॉम्बशोधक-नाशक पथक गंगापूर धरणावर पोहचले. अत्याधुनिक धातुशोधक यंत्र, श्वान पथकाच्या माध्यमातून संपूर्ण धरणाचा परिसर पिंजून काढण्यात आला. रात्री साडेदहा वाजेपर्यंत धरणाच्या परिसरात शोधमोहीम व तपासणी सुरू होती. मात्र पोलिसांना व बॉम्बशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती. याबाबत जलसंपदा विभागालाही विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.गंगापूर धरणाच्या परिसरात अज्ञात व्यक्तींना प्रवेश देऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.तालुका पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीला कॉलरआयडी व्यवस्था नसल्यामुळे अज्ञात धमकीचा फोन कु ठल्या क्रमांकावरून आला होता, हे निष्पन्न होऊ शकले नाही; मात्र पोलिसांनी याबाबत चौकशी करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याच्या चमूला सूचना दिल्या आहेत.
धमकीमुळे गंगापूर धरणाच्या सुरक्षेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:44 AM
नाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के यहां बॉम्ब रखा हैं’ अशी धमकी तालुका पोलिसांना गुरुवारी (दि.१९) अज्ञाताकडून दूरध्वनीवर मिळाली; मात्र पोलिसांनी सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करत चार तास परिसर पिंजून काढला. मात्र धोकादायक वस्तू आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठळक मुद्देबॉम्बशोधक पथकाकडून चार तास तपासणी