शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

शिंदे गटाच्या पक्षविस्तारामुळे शिवसेनेपुढील अडचणींत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 12:38 AM

शिवसेनेतील बंड गुप्त आणि सुप्तपणे घडले, त्याच कार्यपद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार सुरू आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे बंडात सुरुवातीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे गेले. तालुकानिहाय रणनीती व चाचपणी सुप्तपणे सुरू असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसून येत आहे. इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यापाठोपाठ माजी आमदार पांडुरंग गांगडदेखील शिंदे गटात दाखल झाले. गेल्या आठवड्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून शिंदे गटाने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेनेपासून दूर गेलेल्या भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी जिल्हाप्रमुखपदी तर पं.स.चे सभापतीपद भूषविलेल्या अनिल ढिकले यांच्याकडे नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मीबाई ताठे यांची नियुक्ती केली, तर संपर्कप्रमुख म्हणून ठाण्याचे संजय बच्छाव यांना सूत्रे सोपविली आहेत. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे नाशिक महानगरप्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश म्हस्के यांची निवड केली.

ठळक मुद्देनेत्यांपाठोपाठ जुन्या निष्ठावंतांना गळाला लावण्यात यश; सेनेत कुरघोडी व संशयाचे वातावरण गडदतिदमेंच्या बंडाने शिवसेनेत पळापळथकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आघाडीवरओबीसी मतांवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रितगौरीच्या मृत्यूनंतर वेठबिगारीचा प्रश्न ऐरणीवर

मिलिंद कुलकर्णीशिवसेनेतील बंड गुप्त आणि सुप्तपणे घडले, त्याच कार्यपद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार सुरू आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे बंडात सुरुवातीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे गेले. तालुकानिहाय रणनीती व चाचपणी सुप्तपणे सुरू असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसून येत आहे. इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यापाठोपाठ माजी आमदार पांडुरंग गांगडदेखील शिंदे गटात दाखल झाले. गेल्या आठवड्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून शिंदे गटाने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेनेपासून दूर गेलेल्या भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी जिल्हाप्रमुखपदी तर पं.स.चे सभापतीपद भूषविलेल्या अनिल ढिकले यांच्याकडे नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मीबाई ताठे यांची नियुक्ती केली, तर संपर्कप्रमुख म्हणून ठाण्याचे संजय बच्छाव यांना सूत्रे सोपविली आहेत. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे नाशिक महानगरप्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश म्हस्के यांची निवड केली.तिदमेंच्या बंडाने शिवसेनेत पळापळखासदार, आमदार, माजी आमदार शिंदे गटात गेले तरी नाशिक महानगरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. १५ हजार शपथपत्र ह्यमातोश्रीह्णकडे सोपविण्यात आले. त्यामुळे नाशिक एकदम ह्यओकेह्ण आहे, अशा भ्रमात वरिष्ठ पदाधिकारी राहिले आणि शिंदे गटाने ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण केला. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष आणि उपनेते बबनराव घोलप यांचे शिष्य माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांना थेट महानगरप्रमुख म्हणून नियुक्त केले. तिदमे यांच्या बंडानंतर शिवसेनेत खळबळ उडाली. तिदमे यांच्यापाठोपाठ १५-१७ माजी नगरसेवक जाणार असल्याच्या चर्चेने वातावरण तापले. ह्यमातोश्रीह्णवरून निरोप आला आणि सगळे मतभेद, रागलोभ विसरून उपनेते, पदाधिकारी एकत्र आले. ह्यपदाधिकारी नगरसेवकांच्या दारीह्ण असा उपक्रम हाती घेण्यात आला. डॅमेज कंट्रोलचा फायदा किती होतो, हे आता बघायला हवे.थकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आघाडीवरसहकार क्षेत्राने महाराष्ट्राचा एकेकाळी कायापालट केला. सामान्य शेतकऱ्याला मोठा हात दिला. अनेक नेते या क्षेत्राने दिले. आदर्शवत अशा संस्था उभ्या राहिल्या. राज्य, देश एवढेच नाही तर आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या सहकारी संस्थांचा सगळ्यांना अभिमान होता; पण विषवल्ली शिरल्या. पराकोटीचा स्वार्थ बघीतला गेला. आणि सहकार क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले. शेतकऱ्यांना हात देणाऱ्या या क्षेत्राने शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचे काम पुढे जाऊन केले. नाशिक जिल्हा बँकेने यंदा कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीक कर्ज दिले. वार्षिक सभेत सभासद आक्रमक झाले, तेव्हा प्रशासकांना थकबाकीदार असलेल्या १०० लोकांची नावे जाहीर करावी लागली. बँकेचे माजी चेअरमन राहिलेल्या गणपतराव पाटील, देवीदास पिंगळे, माणिकराव कोकाटे यांचे कुटुंबीय या यादीत आहेत. जि.प.च्या माजी अध्यक्षा विद्याताई पाटील, बागलाणचे भाजप आमदार दिलीप बोरसे यांचेही कुटुंबीय आहे. सहकार का बुडतोय, याचे उत्तर या यादीत आहे.ओबीसी मतांवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रितमहाराष्ट्रात निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजार समिती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभा अशा क्रमाने निवडणुका होतील. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा विषय खुबीने हाताळतोय. नाशिक हे ओबीसी चळवळीचे केंद्र बनले आहे. समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्यामुळे मोठी ताकद याठिकाणी तयार झाली आहे. स्वाभाविकपणे प्रत्येक राजकीय पक्ष नाशिकवर लक्ष केंद्रित करीत आहे. भाजपने प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा दिला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून केली. तैलिक सभेच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहिले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र मंथन शिबिरासाठी नाशिकला भेट दिली. या शिबिराला राज्यातील ओबीसी नेते उपस्थित होते. पूर्वी भाजपने ह्यमाधवह्ण प्रयोग यशस्वीपणे राबविला होता. त्याच वाटेने इतर पक्ष आता जात आहेत.गौरीच्या मृत्यूनंतर वेठबिगारीचा प्रश्न ऐरणीवरस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या देशात पाचशे रुपयांसाठी, एका मेंढीसाठी पोटचा गोळा विकायची वेळ येते, हे लांच्छनास्पद आहे. इगतपुरीजवळील उभाडे वस्तीत राहणाऱ्या कातकरी समाजातील गौरीला सहा वर्षांंपूर्वी मेंढपाळांना विकण्यात आले. गेल्या पंधरवड्यात जखमी अवस्थेत तिला घराबाहेर टाकून देण्यात आले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तीन दिवस उपचाराची शर्थ करूनही गौरीचे प्राण वाचले नाहीत. श्रमजीवी संघटनेने हा प्रश्न हाती घेऊन प्रशासनापुढे मांडला, तेव्हा कोठे प्रशासन जागे झाले. २२ वेठबिगार मुलांची सुटका झाली; पण त्यासाठी गौरीला प्राणत्याग करावा लागला. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनसेप्रमुख राज ठाकरे, श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी हा प्रश्न लावून धरला. पोलीस दलाने संबंधितांवर गुन्हे दाखल केले. हा विषय तापल्याने राजकीय व प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली. हा विषय स्मृतिआड जाऊ देता कामा नये. कातकरी समाजाला रोजगार, निवास आणि त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था याचा कायमस्वरूपी मार्ग निघेपर्यंत पाठपुरावा करायला हवा. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका