नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील लहित रस्त्यालगत वसंत बंधाऱ्यात रस्त्याच्या कडेला सोमवारी (दि.१) सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान वनविभागाचे वनमजूर भाऊलाल माळी व शिवाजी पवार हे झाडांना टॅँकरमधून पाणी देत असताना त्यांना खड्ड्यात नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. या वनमजुरांनी सदर नकोशीला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तिला जीवनदान दिले.वनमजुरांना सदर अर्भक आढळून आल्यानंतर त्यांनी प्रारंभी नगरसूलचे सरपंच प्रसाद पाटील यांना या घटनेची माहिती दिली. पाटील उत्तम माळी व नवनाथ मोरे या दोघांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीणरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र डोंगरे व वैद्यकीय अधिकारी मदनूर यांनी उपचार केले असता हे अर्भक कमी दिवसाचे जन्माला आले असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले. त्यामुळे त्यांनी त्या बाळाला नाशिक जिल्हारु ग्णालयात दाखल करण्यासाठी नगरसूल ग्रामीण रु ग्णालयाचीरुग्णवाहिका उपलब्ध करुनदिली.नााशिक जिल्हा रु ग्णालयामध्ये बाळाला दाखल करण्यात आले असून या घटनेची येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, अज्ञात व्यक्तीच्यानावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपासपोलीस निरीक्षक अनिल भवारीयांच्या मार्गदर्शनाखाली नगरसूल क्षेत्राचे सहायक पोलीसउपनिरीक्षक एस. आर. सुराशे, पोलीस शेख, पोलीस सांगळे हे तपास करत आहेत.-------------------खड्ड्यात पडलेले हे बाळ पाहून मजुरांनी पोलीस स्टेशन व नगरसूल ग्रामीण रु ग्णालयाला खबर दिली.तत्पूर्वी वनमजुरांनी आपल्या डोक्याचे उपरणे सोडून ते बाळाला गुंडाळले आणि मोटारसायकलवरून नगरसूल ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले.
वनमजुरांच्या सतर्कतने नकोशीला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:55 PM