सिन्नर : बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या वडांगळी व खडांगळीच्या मध्यावर देवनदीतील देवना व कासारनाला येथील बंधारे दुुरस्ती, गाळ उपसा, वडांगळी येथील विविध विकासकामे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यास पीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुदेश खुळे, सरपंच सुनीता सैद, उपसरपंच किशोर खुळे, बाजार समितीचे संचालक शांताराम कोकाटे, खडांगळीचे उपसरपंच केशव कोकाटे, विजय कुलथे, सलीम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. शहीद संदीप ठोक अभ्यासिका, जलशुद्धिकरण, आरोग्य उपकेंद्र कम्पाउंड, दशक्रिया विधी ठिकाणी किचन शेड, चर्मकार गल्लीत भूमिगत गटार, शाळेकडे जाणारा फुटपाथ रोड, १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ अशा सर्व सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक कामांची भूमिपूजने व वाहनतळ, अल्पसंख्याक वस्तीत सीमेंट कॉँक्रीट रस्ता, बाजारतळ सुधारणा आदी सुमारे ६० लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.बंधायामुळे होणार वडांगळीसह चार गावांना फायदादेवना बंधाºयाची पडझड झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे बंधाºयाची दुुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची बाब या भागातील शेतकरी व विकास सोसायटीचे संचालक बापूसाहेब खुळे, उत्तम खुळे यांच्यासह खडांगळी येथील शेतकºयांनी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या लक्षात आणून दिली. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या गटातील गावेही या बंधाºयाची लाभार्थी गावे असल्याने त्यांनी या कामासह कासार नाल्यावरील बंधारे दुरु स्ती व गाळ उपशा साठी पाठपुरावा केला. मंजूर झालेल्या या कामामुळे वडांगळीसह खडांगळी, मेंढी व चोंढी येथील भूजल पातळी वाढून शेतकºयांना फायदा होणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत देवनदीतील बंधाऱ्यांची दुुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:10 AM