नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊगावे नळपाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी थकल्याने देशवंडी गावचा पाणीपुरवठा बुधवार नंतर खंडीत होण्याची शक्यता आहे.नायगावसह ९ गाव पाणीयोजना जायगाव, वडझिरे, ब्राम्हणवाडे, मोह-मोहदरी विशेषत: देशवंडी आदी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नवसंजीवनी ठरलेली आहे. या योजनेच्या पाण्यामुळे नायगाव खोऱ्यातील गावांची गेल्या काही वर्षापासून पाणी टंचाईपासून सुटका झाली आहे. दरम्यान, देशवंडी येथे गेल्या वर्षभरापासून सुमारे १४० ग्राहकांकडे सुमारे ३ लाख ७० हजार रूपये पाणीपट्टी थकली आहे. देशवंडी येथील ग्राहक थकीत पाणीपट्टी भरत नसल्यामुळे संबंधित प्राधिकरण मंडळाकडून थकबाकीधारक ग्राहकांना बुधवार (दि.१३) पर्यंत थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन योजनेचे कर्मचारी सध्या प्रत्येक ग्राहकापर्यंत जाऊन करत आहे. सध्या परिसरातील गावांना या नळपाणी योजनेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ग्राहकांनी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी थकबाकी भरण्याचे आवाहन या नोटीसद्वारे करण्यात येत आहे.
पाणीपट्टी थकल्याने देशवंडीचा पाणीपुरवठा होणार खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 5:36 PM