जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील जोरण येथे नदी काठी अदिवासी बांधव गावठी दारु विक्र ी करत होता तरु ण वर्गाने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीसांना माहीती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या कर्मचारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने नदी काठी धाड टाकुन गावठी दारु तयार करण्याचे रसायन व साहीत्य नष्ट केले, व एकाला ताब्यात घेतले. या गावातील सर्व तरु ण मंडळी यांनी सर्वानुमते ग्रामपंचायत कार्यालयात ठराव मंजुर करु न सदर हे निवेदन सटाणा पोलीस स्टेशन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना देण्यात आले होते. यावेळी सटाणा पोलीसांनी रविवारी सायंकाळी सहा वाजता बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील गावठी दारु च्या भट्या व दारु चे साहीत्य नष्ट केले. यावेळी पोलीस नाईक पंकज सोनवणे, जयसिंग सोळंके, पोलीस शिपाई राहूल शिरसाठ ,साहेबराव गायकवाड यांनी कार्यवाही केली.
गावठी दारु च्या भट्टया उध्दवस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:32 AM
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील जोरण येथे नदी काठी अदिवासी बांधव गावठी दारु विक्र ी करत होता तरु ण वर्गाने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीसांना माहीती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या कर्मचारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने नदी काठी धाड टाकुन गावठी दारु तयार करण्याचे रसायन व साहीत्य नष्ट केले, व एकाला ताब्यात घेतले.
ठळक मुद्देसटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात पोलीसांची कारवाई