नाशिक : शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सदैव कष्ट उपसणाऱ्या सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व आहे. अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी साजरा पोळा साजराा केला. इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती करीत असल्याने पोळा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. शेती करताना बैल अत्यंत उपयोगी प्राणी असून, नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात. ओझर येथे पोळ्यानिमित्त बैलांची पूजा करताना दांपत्य. यावेळी बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात पोळा
By admin | Published: September 01, 2016 10:38 PM