कळवाडी : मालेगाव तालुक्यातील दापुरे येथे मंगळवारी दुपारी विजेच्या शॉकसर्किटमुळे आग लागून ११ घरे जळून खाक झाली. यात १० लाख ५५ हजार १८५ रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे ११ घरांतील कुटुंबे उघड्यावर आली. मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या एका बंबाने आग विझविली.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजताच दापुरेसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने ११ झोपड्या जळून खाक झाल्या.यात भाऊसाहेब सोनवणे, पुंजाराम पवार, सावळीराम गोºहे, झगा सोनवणे, गोविंदा सोनवणे, सुरेश गोºहे, गंगाराम सोनवणे, दिलीप सोनवणे, बंडू मोरे, शरद सोनवणे, काशीनाथ मोरे, बापू भदाणे, अंकुश पवार यांचे आगीत नुकसान झाले. तलाठी डी. एन. सोलेवाड, सरपंच आशाबाई सूर्यवंशी, ग्रामसेवक कृष्णा धरमकर, ग्रामपंचायत कर्मचारी भीमराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ११ कुटुंबीयांचे संसार उघड्यावर पडल्याने ग्रामस्थांनी दोन कट्टे तांदूळ, दोन हजार रुपये रोख, दोन पोते गहू, दहा किलो तूरडाळ, अंथरूण, पांघरूण आदी साहित्याची मदत केली.
दापुरेत आग लागून ११ घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:23 AM