कालिका देवी संस्था, क्रीडा साधना आणि डी. एस. फाउंडेशन यांच्या वतीने खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी आयोजित जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाईक बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तीचे संघटक रवींद्र मोरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त साहेबराव पाटील, गोरखनाथ बलकवडे, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरंभ कन्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य साहेबराव पाटील, गोरखनाथ बलकवडे आणि रवींद्र मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
खाशाबा जाधव यांनी सन १९५२ च्या हेलसिंकी, फिनलंड येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन मागील तीन वर्षांपासून १५ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस ‘महाराष्ट्र क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २५ मुख्याध्यापकांचा श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्व. खाशाबा जाधव यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारार्थींमध्ये एल. एस. जाधव (सी. डी. ओ. मेरी), डी. एन वाणी (पुरुषोत्तम स्कूल), अलका दुनबळे ( के.जे. मेहता स्कूल आणि ज्यु. कॉलेज), मुरलीधर हिंडे (न्यू इंग्लिश स्कूल, आडगाव), अरुण गायकवाड (जु. स. रुंगठा), श्रीमती संजीवनी धामणे (र. ज. बिटको), साहेबराव अहिरे (टी. जे. चव्हाण), शरद गीते (डे. केअर स्कूल), एकनाथ जगताप (रवींद्र विद्यालय), सिस्टर ट्रेसी (सॅकरेट हार्ट स्कुल), श्रीमती शिल्पा बोरीचा (गुरू गोविंदसिंग स्कूल), मनोहर महाजन (पोद्दार स्कूल), सिस्टर ॲसिस फर्नांडिस (सेंट फिलोमिना स्कूल), श्रीमती माधुरी कसबे (सेंट लॉरेन्स स्कूल), शण्मुख सुंदर (केम्ब्रिज स्कूल), श्रीमती सुरेखा कुलकर्णी (होरायझन अकादमी), श्रीमती स्वाती परचुरे (इंग्लिश मीडियम स्कूल, सिडको), श्रीमती सुगंधा सोनावणे (वैशंपायन विद्यालय), संजय पाटील (सेंट फ्रान्सिस स्कूल, राणेनगर), श्रीमती नीना जोनाथान (पोद्दार इंटरनॅशनल, पाथर्दी) श्रीमती सविता पवार (उपप्राचार्या आरंभ महाविद्यालय) श्रीमती इंदू जायन (गुरू गोविंदसिंग स्कूल प्रा.) राजू सोनावणे (सेंट पीटर स्कूल), अमोल कदम (एस एम जी एस स्कूल) यांचा समावेश होता. यावेळी नाशिक एज्युकेशन सोसाटयाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र निकम यांनाही सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थीच्या वतीने राजेंद्र निकम आणि शरद गीते यांनी मनोगत व्यक्त करून खाशाबा जाधव याच्या खेळातील योगदानाबद्दल नवीन पिढीमध्ये जागृती करण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद खरे यांनी केले, तर सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, शशांक वझे, अविनाश ढोली, दीपक निकम, अर्जुन वेलजाळी, विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे, वैभव दशपुते, मनीषा काठे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो - महाराष्ट्र क्रीडा दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात सन्मानार्थी सोबत प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, रवींद्र मोरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक साहेबराव पाटील, गोरखनाथ बलकवडे, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे, नितीन हिंगमिरे, विलास पाटील आदी. (फोटो १६ क्रीडा)