नाशिक : जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील १९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ११५४ रुग्ण जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार २१७ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून, त्यातील ५६ हजार ५८९ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ६६ हजार २१७, तर अहवाल प्रलंबित असलेल्यारु ग्णांची संख्या २०३९ आहे.जिल्ह्यात २ लाख ३५ हजार १७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील एक लाख ६६ हजार ७६१ रु ग्ण निगेटिव्ह आले आहेत.आतापर्यंत एकूण १२०५ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२०५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील ६६२ नाशिक ग्रामीण हद्दीतील ३६६ मालेगाव महापालिका हद्दीतील १५०, तर जिल्हाबाह्य २७ रु ग्णांचा त्यात समावेश आहे. मंगळवारी जिल्ह्यातील १९८८ रु ग्ण बरे होऊन घरी परतले, तर ११५४ रु ग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दिवसभरात १९८८ रुग्ण ठणठणीत बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:45 AM
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील १९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ११५४ रुग्ण जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार २१७ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून, त्यातील ५६ हजार ५८९ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत
ठळक मुद्देकोरोना संसर्ग : जिल्ह्यात १५ जणांचा मृत्यू; ११५४ नवे बाधित