शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

जिल्ह्यात महिनाभरात ३२,५९३ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 8:20 PM

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख आता हळूहळू घसरणीला लागला आहे. ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात तब्बल साडेअकरा हजार बाधित ...

ठळक मुद्देदिलासादायक : रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ११ टक्क्यांनी वाढ

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख आता हळूहळू घसरणीला लागला आहे. ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात तब्बल साडेअकरा हजार बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकूण ३२ हजार ५०० हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात बरे होण्याच्या प्रमाणात ११ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यात महिनाभरात सुमारे २८०० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. नाशिक जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. दि. २९ एप्रिल २०२१ रोजी जिल्ह्यात तब्बल ४४ हजार ५८० रुग्ण उपचार घेत होते. दि. २९ मे रोजी ही रुग्णसंख्या ११ हजार ९८७ आहे.नाशिक ग्रामीण भागात २९ एप्रिल रोजी १७ हजार २३० रुग्ण होते. ती संख्या २९ मे रोजी ५ हजार ६९३ वर आलेली आहे. त्यावेळी सर्व रुग्णालये, कोविड सेंटर्स रुग्णांनी भरून गेलेली होती. अनेकांची ऑक्सिजनअभावी परवड झाली, तर अनेकांना व्हेंटिलेटर्स न मिळाल्याने जीव गमवावा लागला.रुग्णालयात बेड मिळेनासे झाले होते, तर रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरू होती. महिनाभरापूर्वी असलेले हे चित्र आता खूपसे बदलल्याचे दिसून येत आहे. दि. २९ एप्रिल रोजी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८४.८२ टक्के इतकी होती. ती आता २९ मे रोजी ९५.६८ टक्के इतकी झाली आहे. जवळपास १०.८६ टक्क्यांनी कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे.कोरोनाबाधितांचा घसरणीला लागलेला हा आलेख प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारा ठरत आहे. शिवाय, रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने निर्बंध हळूहळू शिथिल होत जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.निफाड, सिन्नरमध्ये कमालीची घसरणजिल्ह्यात निफाड तालुक्यात गेल्या महिनाभरात सर्वाधिक रुग्ण होते. दि. २९ एप्रिल रोजी निफाड तालुक्यात ३४२५ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील २७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६२७ रुग्ण उपचार घेत आहेत. निफाड तालुक्यात अनेक गावांनी कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले.जवळपास १२ दिवस बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने घटण्यास मदत होऊ शकली. निफाडपाठोपाठ सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या मोठी होती. सिन्नर तालुक्यात दि. २९ एप्रिल रोजी १६४० रुग्ण होते. ती संख्या आता ६५४ वर आलेली आहे. देवळा, बागलाण, चांदवड, दिंडोरी, येवला या तालुक्यांतही रुग्णसंख्येतील घट दिलासादायक मानली जात आहे.दि. २९ एप्रिल २०२१रुग्णसंख्या - ४४,५८०कोरोनामुक्तीची टक्केवारी - ८४.८२ टक्केदि. २९ मे २०२१रुग्णसंख्या - ११,९८७कोरोनामुक्तीची टक्केवारी - ९५.६८ टक्के

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल