नाशिक : मुत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहीमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तीसºया मजल्यावरील कक्षाची काच फोडून खाली उडी घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, रहीमखान हे मालेगावमधील गुलशननगर येथील रहिवासी असून त्यांना मुत्रपिंड विकार असल्यामुळे उपचारासाठी संदर्भ सेवा रुग्णालयात नातेवाईकांनी शुक्रवारी दाखल केले होते. शुक्रवारी त्यांचा एक डायलिसीस यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आला. त्यांची प्रकृती सुधार होऊ लागला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. उपचाराचा भाग म्हणून शनिवारी चार तासाचे डायलिसीस करण्यासाठी त्यांना अतिदक्षता विभागातून तीसºया मजल्यावरील डायलिसीस कक्षात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हलविण्यात आले. डायलिसीसची प्रक्रीया सुरू होऊन तीन तास उलटले होते; मात्र अचानकपणे रहीमखान यांनी संतापून डायलिसीस प्रक्रिया बाधित केली आणि खिडकीजवळील रुग्णाच्या खाटावर चढून डोक्याने जोराची धडक मारून खिडकीची काच फोडली व तेथून खाली उडी घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तीस-या मजल्यावरुन उडी घेतल्याने रहीमखान गंभीर जखमी झाले होते. ही घटना लक्षात येताच सुरक्षारक्षक व डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना जखमी अवस्थेत उचलून तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले व उपचारास सुरूवात केली; मात्र जबर मार व रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली. आजारपणाला कंटाळून त्यांनी अशाप्रकारे पावले उचलली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
‘संदर्भ’ रुग्णालय : ‘डायलिसीस’ दरम्यान तीसऱ्या मजल्यावरुन रुग्णाने घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 5:33 PM
आजारपणाला कंटाळून त्यांनी अशाप्रकारे पावले उचलली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देडोक्याने जोराची धडक मारून खिडकीची काच फोडली रहीमखान हे मालेगावमधील गुलशननगर येथील रहिवासी