येवला : येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात एकूण कांदा आवक २४९३२ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. २५० ते ७८८ तर सरासरी रु. ५७५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते.तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ११८६४ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. २०० ते रु. ६७५ तर सरासरी ५२५ प्रतिक्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाची एकूण आवक २६ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १६०५ ते कमाल रु. २१०० तर सरासरी १७०१ पर्यंत होते. सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर होते. बाजरीची एकूण आवक ७० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १०८० ते कमाल १७५१ तर सरासरी ११२५ पर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक ३४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ३१०१ ते कमाल ३५६५ तर सरासरी ३३५० पर्यंत होते. सप्ताहात मक्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. मक्याची एकूण आवक ३७८१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ११५० ते कमाल १२६५ तर सरासरी १२१० प्रतिक्विंटल पर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार यांनी दिली.
सप्ताहात २४ हजार क्विंटल आवक येवल्यातील उन्हाळ कांदा आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:26 AM
येवला : येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात एकूण कांदा आवक २४९३२ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. २५० ते ७८८ तर सरासरी रु. ५७५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत ...
ठळक मुद्देसप्ताहात गव्हाची एकूण आवक २६ क्विंटलसोयाबीनची एकूण आवक ३४ क्विंटल