जानोरी : सतत पडणारा पाऊस कोरोनाचे सावट , सण उत्सवांवर आलेल्या मयार्दा यामुळे जिल्ह्यात यावषर्प झेंडु लागवड कमी झाली असून नवरात्र, दसरा, दिवाळीत झेंडुची फुल भाव खातील असा अंदाज र्वतविला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना झेंडु मातीमोल दराने विकावा लागत आहे.जिल्हत चार ते पाच हजार एकरवर झेंडुची लागवड होते. काही शेतकरी दसरा दिवाळीचा सीजन पुरताच झेंडु लावतात तर काही शेतक?्यांकडे वषार्तील बाराही महिने झेंडु उपलब्ध असतो. कोरोनामुळे झेंडु विकला जाईल की नाही याचा कोणताही अंदाज नसल्यामुळे यावषर्प अनेक शेतकऱ्यांनी झेंडु लागवडीला फाटा दिला आहे. तर काहींनी आंतरपिकम्हणून झेंंडुची लागवड केली आहे. यातुन एकाच जमीनीत दोन पिक घेउऊन खचार्चा ताळमेळ बसविण्याचा शेतकºयांचा प्रयत्न असतो. सध्या मंिदर बंद असल्यामुळे झेंडुला मागणी नाही त्यामुळे शेतकºयांना अगदी कमी किमतीत माल विकावा लागत आहे.मुंबई बाजारात तर अगदी दहा रुपये किलोने झेंंडु विकावा लागत आहे. तर नाशिक बाजारात २० ते ३० रुपये किलोपर्यंतचा दर मिळत असल्याचे शेतक?्यांनी सांगितले. गणपती उत्सवाच्या काळात मात्र झेंडुचे दर थोड्याफार प्रमाणात वाढले होते. यावर्षी गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांनी शंभर रुपये पासून ते दोनशे रुपये पर्यंत किलोचा भाव मिळाला होता.परंतु गणेशोत्सव संपल्यानंतर झेंडू उत्पादकांना पाच रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत किलो भावाने झेंडू विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे झेंडू उत्पादकांना खचर्ही निघेना झाला आहे. पंधरा दिवसापूर्वी तर काही शेतकºयांनी भाव नसल्याने झेंडूचे फुले फेकून देण्यात आले होते .अतिशय महागडी रोपे विकत घेऊन झेंडूची लागवड केली आहे. तसेच ६०ते ७० हजार रुपये खर्च करून झेंडूचे उत्पादन घेतले आहे परंतु सध्या झेंडूच्या फुलांना भाव नसल्याने खचर्ही निघेना असे झाले आहे. पाच-सहा दिवसावर नवरात्रोत्सव येत आहे या नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे या नवरात्रातच झेंडूच्या फुलांचे पैसे होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.विलास काठे, शेतकरी, जानोरीकोरोनामुळे विक्रीबाबत संभ्रम असल्याने यावषर्प झेंडुची लागवड कमी झाली आहे. आम्ही द्राक्ष बागेत आंतरपीक म्हणून झेंडु लागवड केली आहे. दसरा दिवाळीत भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. आमच्याकडे गुलाबही असल्याने आमचा माल मुंबई, सुरत येथील बाजारात जातो. मागणी अभावी सध्या मुंबईत झेंडु दहा रुपये किलोने विकावा लागत आहे. - शिवाजी शेवकर, फुल उत्पादक शेतकरी, कसबे सुकेणे.