जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षापासून स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील किल्ले रामशेज येथे दसरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता, हा दसरा महोत्सव दुर्ग प्रेमींसाठी पर्वणीच असते. कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेत विधीवत या वर्षीचा दसरा महोत्सव जल्लोषात किल्ले रामशेज येथे संपन्न झाला.महोत्सवाची सुरुवात शिवभक्त गणेश सोमासे यांनी गडदेवतेचे सपत्नीक पुजनाने केली. प्रवेशद्वारात केलेली भगव्या भंडार्याची उधळण दुर्ग प्रेमीचा आनंद द्विगुणीत करणारी होती. शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक विशाल जाधव यांनी सपत्नीक केला तर धज्वारोहण सिंहगर्जना वाद्यपथकाचे संस्थापक प्रीतम भामरे यांनी केले.धारकरी अन वारकर्याच्या सीमोल्लंघणाचा हा दसरा दुर्गमहोत्सव म्हणजे, "आजी सोनियाचा दिनु" अशा उल्लेख शिव कार्य गडकोडचे राम खुर्दल सर यांनी केला. उपस्थित दुर्ग प्रेमी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले कि, स्वराज्य साकारताना शिवरायांनी आणि रणमर्द मावळ्यांनी केलेल्या त्यागातुन आणि संमर्पणातुन स्वराज्य केले. अशा त्यागाने, जिद्दीने आणि संमर्पणातुन मोहिमा राबवल्या तर हे दुर्ग वाचतील. फक्त दुर्ग भ्रमंती करुन चालणार नाही तर त्याच बरोबर दुर्ग रचनेची घटना वाचायला हवी. जेव्हा दुर्ग संवर्धन करतात असतात तेव्हा तिथल्या कणाकणांत वसलेल्या मावळ्यांच्या श्वासांचा स्पर्श तुम्हाला होतो तेव्हा तुमच्या अंगात एक विजयश्री संचारते. तसेच येथे उपस्थित प्रत्येक मावळ्यांने आपल्या गावात दुर्ग संवर्धनाचा जागर करावा.रामशेज किल्ल्याच्या ऐतिहासिक घडामोडींना उजाळा देताना शिवव्याख्यात्ये श्री. दिपकराजे देशमुख म्हणाले की "इथल्या दगडांनीही इतिहास घडवला कारण, इथली जमीन रामनामांच्या शक्तीने पावन झालेली ही भुमी आहे. किल्ल्यांवरील मावळ्यांनी गनिमी कावा तर केलाच पण त्यांच बरोबर बुद्धीचातुर्य ही वापरले. त्यामुळे हजारोंच्या मुघल सेनेला सहाशे मावळ्यानी झुंजावले.या दुर्ग महोत्सवाचे मुख्य आकर्षण बाळ शिलेदार ठरले. चि. वंश जाधव यांने दिलेली शिवगारद व कु. आराध्या शिंदे हिने गायलेला अफजल खान वधाचा पोवड्याने सर्वाना मंत्रमुग्ध केले तर चि. अव्दैत देशमुख आणि युवराज यांनी दाखवलेल्या लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांने डोळ्याचे पारणे फेडले. कु. विभावरी जगताप ने केलेला जिजाऊ मॉसाहेबाचा पेहराव आणि शिवगारद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.उपस्थित सर्व मावळ्यांचे स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचे संस्थापक कैलास दुघड यांनी आभार मानले तसेच पुढील दुर्ग मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सिंहगर्जना वाद्यपथकाचे प्रीतम भामरे,नाशिक प्रभागाचे शुमभ मेधने,राम दाते सहकारी तसेच येवला, चांदवड, निफाड विभागातील दुर्ग प्रेमी तसेच महिला भगिनीं ही मोठ्या संख्येत सहभागी होत्या.