शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नाशिक महापालिकेच्या महासभेत स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत डस्टबिन खरेदी घोटाळा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:26 PM

खरेदीचा अहवाल मागविला : लोकप्रतिनिधींच्या अधिकाराबाबत सभागृह एकवटले

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणांतर्गत अव्वाच्या सव्वा किंमत मोजून खरेदी केलेल्या डस्टबिनप्रकरणी विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्तसंकट हीच संधी मानून प्रशासनाने खरेदीत दाखविलेल्या तत्परतेबद्दल आश्चर्य व्यक्त

नाशिक - महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत अव्वाच्या सव्वा किंमत मोजून खरेदी केलेल्या डस्टबिनप्रकरणी विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. महापौरांनीही या घोटाळ्याची गंभीर दखल घेत पुढील महासभेत डस्टबिन खरेदीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, प्रशासकीय मान्यता नसतानाही होणा-या कामांबाबतही सभागृहाने आक्षेप घेत कायद्यातील कलम दाखवत आपल्या अधिकार व हक्काची जाणीव प्रशासनाला करुन दिली.महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डस्टबिन खरेदी घोटाळ्यातील संशयास्पद बाबींकडे सभागृहाचे लक्ष वेधले. महासभेची कुठलीही प्रशासकीय मान्यता नसताना धोरणात्मक विषय हाताळत प्रशासनाने सभागृहाच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोपही त्यांनी केला. कचरामुक्त शहराची संकल्पना राबविण्याऐवजी डस्टबिनच्या माध्यमातून कचरा कुंड्या पुन्हा नव्याने उभ्या केल्या जात असल्याबद्दल बोरस्ते यांनी आश्चर्य व्यक्त केले. खरेदीतील १५ टक्के ओव्हर हेडींग चार्जेस कुणासाठी, असा सवाल करत बोरस्ते यांनी या सा-या खरेदीची सखोल चौकशीची मागणी केली. पश्चिम प्रभागच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी संकट हीच संधी मानून प्रशासनाने खरेदीत दाखविलेल्या तत्परतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि असे डस्टबिन लावून २ गुणही महापालिकेला मिळणार नसल्याचे सांगितले. गुरुमित बग्गा यांनी महासभेची मान्यता नसताना अशी कामे करता येतात काय, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाला कोंडीत पकडले. गोदावरी नदीवरील पुलांवर ग्रीननेटही मान्यतेशिवाय लावण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत या सा-या प्रकरणाचा पंचनामा केला. सुधाकर बडगुजर यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांसह अन्य झालेल्या कामांनाही प्रशासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी या अनियमिततेबद्दल चौकशीची मागणी करत स्मार्ट सिटी कंपनीकडून परस्पर होणा-या कामांना आक्षेप घेतला. राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी सदस्यांच्या अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप केला. भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनीही डस्टबिन खरेदीबाबतचा प्रस्ताव महासभेवर आला नसल्याचे सांगत यासारखी अनेक प्रकरणे महासभेची मंजूरी न घेताच झाल्याचा आरोप केला. सभागृहनेता दिनकर पाटील यांनी तर गेल्या पाच वर्षात प्रशासकीय मान्यता नसताना झालेल्या कामांची स्वतंत्र सनदी लेखापालामार्फत चौकशीची सूचना केली आणि डस्टबिन खरेदीप्रकरणी दोेषींवर कारवाईची मागणी केली. महापौर रंजना भानसी यांनी डस्टबिन खरेदीबाबतचा सविस्तर अहवाल पुढील महासभेत ठेवण्याचे आदेशित करतानाच मागील पाच वर्षात प्रशासकीय मान्यता नसताना झालेल्या कामांचाही चौकशी अहवाल महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले.शिवसेनेचा आक्रमक पवित्राशिवसेनेच्या सदस्यांनी ‘डसबीन घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा लिहिलेले फ्लेक्स अंगावर चढवत सभागृहात डस्टबिन खरेदीप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला काळीमा फासण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप शिवसेनेने करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना