भगूर : येथील मातोश्री रमाबाई महिला मंडळ व चॅलेंज क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यदक्ष माता व राष्ट्रीय क्रीडा स्तरावरील ग्रामीण विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनीता आडके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संगीतकार धनंजय धुमाळे, गायिका लता धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जाधव, ऋषिकेश सम्मनवार, माजी नगराध्यक्ष भारती साळवे, विद्या बलकवडे, डॉ. नीलेश नांदुरकर, मोहन इंगळे, योगेश पाटील, मंदा फड, दीपक बलकवडे, दादासाहेब देशमुख आदि उपस्थित होते. यावेळी कर्तव्यदक्ष माता म्हणून सुलोचना जाधव, सुशीला हांडोरे, सरला बरकले, रंजना अढांगळे, ललिता नांदुरकर, शकुंतला धुमाळ, मंदा फड, रूक्मिणी साळवे, सुलभा देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय व राज्य पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी साईना खान, अक्षदा देशमुख, आकांक्षा देशमुख, ज्योती पाटोळे, समता पाटील, प्रियंका पाळदे, नलिनी आहिरे, वैष्णवी काळे, उज्ज्वला घुगे, सर्वज्ञा पाळदे, करिना गडवघे, साधना भांगरे आदिंचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम- सिद्धी लाहोटी, द्वितीय - रूतिका करंजकर, तिसरी - पूर्वा शिरसाट, मोठा गट प्रथम - श्वेता शिरोळे, द्वितीय- दुर्गा जाधव, तृतीय - अक्षदा जाधव, रांगोळी स्पर्धा प्रथम- दिव्या करंजकर, द्वितीय - नेहा गालफाडे, तृतीय - शीला सोनवणे. पाककला खुला गट प्रथम- सुलभा देशमुख, द्वितीय - दीप्ती लाहोटी, तृतीय - योगेश्वरी ओहोळ, निबंध स्पर्धा खुलागट प्रथम - ज्योती कदम, विजया चतुर, उज्ज्वला भोर, तसेच माय माझी सरस्वती छायाचित्र स्पर्धेत प्रथम- गायत्री डोळस. माझ्या आईसोबत संवाद स्पर्धेत प्रथम- सुलभा देशमुख, आई काव्य स्पर्धेत प्रथम- कोमल कनोजिया आदिंचा सत्कार करण्यात आला.
कर्तव्यदक्ष मातांचा सत्कार
By admin | Published: March 10, 2016 11:31 PM