इगतपुरी : शहरातील रेल्वे तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही, मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेकजण पोहण्यासाठी जातात. या तलावात अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत.बुधवारी (दि. ४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास किरण जनार्दन जव्हारकर (६५) हे नेहमीप्रमाणे शहरातील रेल्वे तलावात पोहण्यासाठी गेले. पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यु झाला. यापूर्वीही या तलावात अनेकांचे प्राण गेले आहेत, तर अनेकांनी या तलावात आत्महत्या केली आहे. रेल्वे तलावाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेच्या आय. डब्ल्यू. या विभागाची असताना त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या तलावातून रेल्वे कॉलनी, रेल्वेस्थानक, रेल्वे रु ग्णालय या मुख्य ठिकाणी रोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने या तलावाच्या सुरक्षेविषयी लक्ष देणे आवश्यक आहे. पोलिसांनी पंचनामा करून किरण जव्हारकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रु ग्णालयात पाठवला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
इगतपुरी येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:06 AM
इगतपुरी : शहरातील रेल्वे तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही, मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेकजण पोहण्यासाठी जातात. या तलावात अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत.
ठळक मुद्दे या तलावात अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत.