सटाणा : कसमादे पट्ट्यात यंदा डाळिंब विक्र मी भावाने विकला जात असून डाळिंबाने भावात शंभरी पार केली असतांना अर्ली द्राक्षाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाºया बागलाणमध्ये द्राक्ष देखील तेजीत आहे. द्राक्षाची तालुक्यात शिवार खरेदी सुरु असून सरासरी प्रती किलो ११० रु पये भावाने द्राक्ष विकला जात आहे.सध्या बांगलादेश व पश्चिम बंगालकडून अर्ली द्राक्षाला मोठी मागणी आहे.बागलाण तालुक्याच्या शेतकºयांना तब्बल अडीच दशके डाळींब नगदी पिक म्हणून पसंतीस पडले. मात्र गारपीट , बेमोसमी पाऊस त्यात तेल्यासारख्या महाभयंकर रोगाचे आक्र मण यामुळे हे पिक हद्दपार होण्याच्या मार्गावर आले. एकीकडे शेतकरी डाळींब पिक जतन करण्याच्या नादात कर्जबाजारी होत असतांना दुसरीकडे मात्र बहुतांश शेतकºयांचा भौगोलिक रचना आणि वातावरणाचा ताळमेळ साधत दुसरे नगदी पिक म्हणून अर्ली द्राक्ष पिक घेण्याकडे कल आहे.गेल्या तीन वर्षात द्राक्ष लागवडीमध्ये चार पटीने वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते.चार वर्षांपूर्वी साडे तीनशे एकर क्षेत्रावर द्राक्ष पिक घेतले जात.मात्र डाळींब पिक नामशेष होत चालल्यामुळे त्याची जागा अर्ली द्राक्ष पिकांनी घेतली.तालुक्यात यंदा सोळाशे हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिक उभे आहे. अर्ली द्राक्ष हंगाम तसा १ जूनपासूनच सुरु होतो . १ जून पासून गोडी छाटणी सुरूवात होते. ती आॅगस्ट ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत केली जाते. तालुक्यात थोमसन ,क्लोन -२ ,ताज गणेश, सोनाका, नाना पर्पल आदी वाणाचे द्राक्ष पिक घेतले जात आहे. त्यात मोसम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी व गिरणा खोरे अव्वलस्थानावर आहे.——————————————
बागलाणमध्ये अर्ली द्राक्ष हंगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 6:19 PM
कसमादे पट्ट्यात यंदा डाळिंब विक्र मी भावाने विकला जात असून डाळिंबाने भावात शंभरी पार केली असतांना अर्ली द्राक्षाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाºया बागलाणमध्ये द्राक्ष देखील तेजीत आहे. द्राक्षाची तालुक्यात शिवार खरेदी सुरु असून सरासरी प्रती किलो ११० रु पये भावाने द्राक्ष विकला जात आहे.
ठळक मुद्देसरासरी ११० रूपये किलो भाव बांगला देशसह पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्यांची शिवार खरेदी सुरु