ठळक मुद्देशेतकरीवर्गात चिंतेची भर पडली
नाशिक : थंडीचा गारवा वाढत असतानाच जिल्ह्यात बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, नांदगाव, सिन्नर तालुक्यात झालेल्या या पावसाने द्राक्षपिकासह कांदा लागवड धोक्यात आली असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. बुधवारी पहाटे पिंपळगाव बसवंत भागात मुसळधार पाऊस पडल्याने द्राक्षबागांना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, कांदा रोपांचेही मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच कांदा रोपांची टंचाई भासत असताना आता अवकाळी पावसानेही संकट उभे केल्याने शेतकरीवर्गात चिंतेची भर पडली आहे.