वणी : दिंडोरी तालुक्यातील बाबापुर येथील वनविभागाच्या जागेत बांधलेला मातीबंधारा फुटल्याने भातशेती, कांदा, टमाटा या पिकांचे नुकसान झाले असुन शेत जमीनीतील दोन विहीरींना याचा फटका बसला आहे.याबाबत माहीती अशी की बाबापुर ते मार्कंडेय पर्वत रस्त्यादरम्यान वनविभागाच्या जंगलात सुमारे २५ फुट खोली,७० फुट लांबी ५ फुटाचा भराव असलेला मातीबंधारा गट नंबर ५९ व कुंपण नंबर ५६६ मधे वनविभागाने सुमारे चार महीन्यापुर्वी बांधला आहे, अशी माहिती बाबापुर येथील वनसमीतीचे अध्यक्ष व सरपंच गुलाब गावित यांनी दिली. पशु, पक्षी, वन्यजीव व जंगल परिसरात वास्तव्यास असलेल्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतुने पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्र मास अनुसरु न सदरचा मातीबंधारा बांधण्यात आला होता.शनिवारी रात्री हा मातीबंधारा फुटला सुमारे दहा फुट अंतराइतके भगदाड पडले. मातीबंधाऱ्यातील पाणी प्रवाहीत होत असल्याचा आवाज आला नाही. सकाळी ही बाब लक्षात आली. तेव्हा माती बंधाºयातील पाणी एका विहीरीत गेल्याने विहीर पुर्णत: भरली अंबादास देवराम राऊत यांचे मालकीची गट नंबर १०७ येथे ही विहीर आह.े येथे शेतजमीन राऊत यांची असुन त्यातील टमाटा ०.४० आर, कांद्याचे रोप ०.४० आर, कोथींबीर ०.२० आर अशा पिकांचे नुकसान झाले, तर गुलाब लक्ष्मण बोरसे यांच्या विहीरीची क्षती झाली. पोपट पांडु साबळे यांची ०.३० आर भातशेतीचे नुकसान झाले. पोपट यशवंत राऊत ०.४० आर भातशेतीचे नुकसान झाले. महसुल विभागाचे तलाठी एल. जी. पवार यांनी या नुकसानीचा पंचनामा केला आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. तसेच महसूल विभागाने पंचनाम्याचे सोपास्कार पुर्ण केले तरीही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनह अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. (२० वणी १,२)
वनविभागाचा मातीबंधारा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:18 PM
वणी : दिंडोरी तालुक्यातील बाबापुर येथील वनविभागाच्या जागेत बांधलेला मातीबंधारा फुटल्याने भातशेती, कांदा, टमाटा या पिकांचे नुकसान झाले असुन शेत जमीनीतील दोन विहीरींना याचा फटका बसला आहे.
ठळक मुद्देबाबापुरच्या जंगल : पिकांसह दोन विहीरीचे नुकसान