पेठ (जिल्हा नाशिक)- तालुक्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान भुकंप सदृष्य धक्के जाणवले असून कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुकवारी रात्री 9 वाजून 6 मिनिटांनी आमदाडोह भागात मोठा आवाज झाल्याने परिसरात हादरे बसल्याचे जाणवले. यामुळे गोंदे, भायगाव, देवगाव, निरगुडे भागातील ग्रामस्थ सतर्क झाले. तलाठी , ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी दुरध्वनीवरून तालुका प्रशासनाला माहीती कळवली. या संदर्भात मेरी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. ओडीशा किनारपट्टीवर आलेल्या फनी वादळाच्या पाश्र्वभूमीवर पेठ मधील हादरे दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी मत व्यक्त केले. गोंदे भागात भुकंपमापक यंत्र बसवण्याची ग्रामस्थांची मागणी अजूनही पुर्ण झाली नाही.