नाशिक : पेठ तालुक्यातील गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.शुक्रवारी रात्री ९ वाजून ६ मिनिटांनी आमदाडोह भागात मोठा आवाज होऊन परिसरात हादरे बसल्याचे जाणवले. यामुळे गोंदे, भायगाव, देवगाव, निरगुडे भागातील ग्रामस्थ सतर्क झाले. तलाठी, ग्रामसेवक व पोलीसपाटील यांनी दूरध्वनीवरून प्रशासनाला माहिती कळवली.गोंदे भागात भूकंपमापकयंत्र बसविण्याची ग्रामस्थांची जुनी मागणी असून ती अद्यापही पूर्ण झालेली नाही.
पेठ तालुक्यात जाणवले भूकंपसदृश धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:42 AM