शहरात दिवसागणिक कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला अडचण निर्माण होत असून, यंदा मार्चअखेर पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने २१ कोटी ७ लाख २४ हजार रुपये घरपट्टी तर ९ कोटी ५ लाख २९ हजार रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. महापालिकेच्या पूर्व विभागात पाच प्रभाग येतात. यामध्ये जुने नाशिक, द्वारका, गांधीनगर, डीजीपीनगर क्रमांक १, इंदिरानगर, वडाळा गाव, राजीवनगर, विनयनगर, साईनाथनगर, शिवाजीवाडी, परबनगर, सूचितानगर, दीपलीनगर व कलानगर परिसर येतो. पूर्व विभागीय कार्यालयांतर्गत सुमारे ८३ हजार ७४३ हजार घरपट्टी मिळकतधारक आहेत. त्यांच्याकडून घरपट्टीपोटी ८३ कोटी ६८ लाख ७९ हजार ७७ रुपयांपैकी २१ कोटी ६ लाख ४१ हजार ४९ रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच २९ हजार ५१९ नळजोडणीधारक आहेत. त्यांच्याकडून २९ कोटी २२ लाख ३८ हजार ४७१ रुपयांपैकी अवघे नऊ कोटी पाच लाख २९ हजार १२९ रुपये वसूल करण्यात आले आहेत. ज्या मिळकतधारकांकडे एक लाखाच्यावर घरपट्टी बाकी आहे, अशा ९२ मिळकतधारकांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. सदर मोहीम कर उपायुक्त प्रदीप चौधरी, विभागीय अधिकारी स्वप्निल मुदलवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ए चव्हाणके, रवींद्र धारणकर अधिकारी व कर्मचारी राबवीत आहेत.
चौकट== सन २०१९ ते २०२० पेक्षा यंदा दहा कोटींनी घरपट्टी कमी वसुली झाली तर गतवर्षीपेक्षा यंदा दोन कोटींनी पाणीपट्टी जास्त वसूल झाली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.