नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व असलेल्या अस्वली, बेलगाव कुºहे, नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, कुºहेगाव, जानोरी आदी गावांमध्ये बैलाची सजावट करून पारंपारिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला.ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.यांञकि युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतू या सणाच्या निमित्ताने शेतकर्यांना बैलजोडी विषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय करण्याचा दिवस म्हणजे पोळा. आज सकाळपासूनच दर्जा राजाला सजवण्यास सुरूवात झाली आहे. इगतपुरीच्या पूर्व भागात नांदूरवैद्य, अस्वली, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला आदी गावांमध्ये बैलपोळ्याची जय्यत तयारी पहावयास मिळते आहे. बैलपोळ्यानिमित्त ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनवलेल्या बैलाची मनोभावे पूजा करतात. आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे शेतकर्यांनी बैलांना सजावट केली होती. दरवर्षी सायंकाळी ढोलताशांच्या ठेक्यावर सजवलेल्या मानाच्या बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते परंतू यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. मारूती मंदिराजवळ आल्यानंतर बैलांना सलामी देवून घरी आणण्यात आले. यानंतर बैलांची मनोभावे पूजा केल्यानंतर नैवैद्य दाखवण्यात आला. इगतपुरी तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती असल्यामुळे पोळा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. शेती करतांना बैल हा अतिशय महत्वाचा प्राणी असून नांगरणे, वखरणे, मळणी आदी सर्व कामे बैलांच्या मदतीनेच केली जात असल्यामुळे बैलपोळ्याला बैलाचा विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
इगतपुरीच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 4:26 PM
नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व असलेल्या अस्वली, बेलगाव कुºहे, नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, कुºहेगाव, जानोरी आदी गावांमध्ये बैलाची सजावट करून पारंपारिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला.
ठळक मुद्देयावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक रद्द करण्यात आली