शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

सुलभ शौचालयास स्थानिकांचाच विरोध

By admin | Published: November 23, 2015 10:52 PM

राजीवनगर : राजकारण होत असल्याचा आरोप

इंदिरानगर : येथील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात सुलभ शौचालय योजना राबविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, स्थानिकांनी मात्र त्यास विरोध दर्शविला आहे. या विरोधामुळे शौचालय बांधण्यासाठीचा मंजूर निधी अद्यापही पडून आहे. राजीवनगर झोपडपट्टीचा विस्तार पाहाता या ठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यासाठी महापालिकेकडून जागेची निश्चिती करण्यात आली होती. नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर करवून घेतला आहे. परंतु गेल्या सात महिन्यांपासून शौचालय बांधण्यास विरोध होत असल्याने शौचालयाचे काम होऊ शकलेले नाही. काही नागरिकांनी शौचालय बांधण्याचे स्वागत केले होते. परंतु काही राजकीय वरदहस्त असलेले तथाकथित नेते शौचालय बांधण्यास विरोध करीत असल्यामुळे सदर प्रश्न पडून आहे. राजीवनगर झोपडपट्टी ही खासगी जागेवर वसलेली असल्यामुळे या ठिकाणी मनपाकडून सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून येथील महिलांना उघड्यावरच शौचास जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सोनवणे यांनी याच जागेमध्ये शौचालय बांधण्याची तरतूद करून महापालिकडून निधीही मिळविला. मात्र आता त्यास विरोध होऊ लागला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी एका खासगी जागेत दहा ते बारा झोपड्या होत्या. नंतरच्या काळात त्यात वाढ होत जाऊन आज सुमारे दीड हजारापेक्षा जास्त लोकसंख्या या झोपडपट्टीत राहात आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने निर्माण झाला आहे. येथील वस्ती ही खासगी जागेत असल्यामुळे पालिकेकडून त्यांना कोणत्याही प्रकारे प्राथमिक सुविधा देऊ शकत नाही. येथील खासगी जागा, शंभर फुटी रस्त्यावर येथील नागरिक शौचास बसत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गाव, परिसर हगणदारीमुक्त झाला पाहिजे यासाठी शासनाकडून व्यापक मोहीम राबविली जाते. परंतु शहरातील झोपडपट्ट्या हगणदारीमुक्त कधी होतील, हा खरा प्रश्न आहे. काही लोक केवळ विरोधाला विरोध करीत असतील तर नागरिकांच्या आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यासाठी सामंजस्याची भूमिका दाखविण्याची गरज आहे. (वार्ताहर)