शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

येवल्यातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 10:26 PM

येवला तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांची कसरत : अपघातांमध्ये वाढ; तत्काळ दुरुस्तीची मागणी

येवला : शहरासह तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.निधी येणार आणि येवला शहरातील सगळे रस्ते होणार हेगेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या वतीने वारंवार सांगितले जात असले तरी रस्ते होत नाहीत. खड्डेदेखील बुजवले जात नाहीत. पालिकेत गल्ली ते दिल्ली सत्ता असताना शहराची परिस्थिती बदलण्याची अपेक्षा फोल ठरलेली दिसून येत आहे. जागोजागी मोठेमोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरातील गंगादरवाजा ते कोर्ट रस्ता, जुनी नगरपालिका थिएटररोड, मेनरोडची चाळण झाली आहे. पायी चालणेदेखील जिकरीचे झाले आहे. वाहन चालवताना अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांचे हाल थांबवावे, अशी मागणी होत आहेत.पालकमंत्र्यांच्या सूचनेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षयेवला मतदारसंघातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून, अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. काही रस्त्यांची द्वैवार्षिक देखभाल दुरु स्ती करण्यासाठी निविदाप्रक्रि या सुरू असली तरी ही प्रक्रि या तातडीने अंतिम करून या रस्त्यांची दुरु स्ती हाती घेण्यात आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कामाचा देखावा; गुणवत्तेवर प्रश्नचिन्हरस्त्याची अधूनमधून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र,काम होताच महिनाभरातच उखडतो आणि पुन्हा खड्डेहोतात. पालिकेकडे जाणारा रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकदिसेनासे झाले आहेत व हीच अवस्था राणाप्रताप खुंटावरील रस्त्याची झाली आहे. त्यामुळे कामांचा केवळ देखावा केला जात असून, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर सत्ता आणि पदे मिळवण्याच्या गर्तेत असणारे नगरसेवक कर्तव्य पार पडणार की नाही? असा प्रश्न येवलेकरांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा