शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाईचे ग्रहण मिटता मिटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 6:54 PM

श्याम खैरनार सुरगाणा : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील काही गावे आणि पाड्यांचे पाणीटंचाईचे ...

ठळक मुद्देटँकरची प्रतीक्षा : तीन गावांचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे सादर

श्याम खैरनारसुरगाणा : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील काही गावे आणि पाड्यांचे पाणीटंचाईचे ग्रहण अद्याप संपलेले नाही. ह्यनेमेचि येतो पावसाळाह्ण या उक्तीप्रमाणे दरवर्षी उन्हाची तीव्रता वाढली की, काही गावांमध्ये व पाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ बसू लागते. या वर्षीदेखील तीन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.तालुक्यात एकही मोठे धरण नसल्याने, तसेच माफक प्रमाणात पाऊस पडूनही बहुतांश गाव पाड्यांना साधारण फेब्रुवारी अखेरपासून पाण्याची कमतरता जाणवायला सुरुवात होते. गतवर्षी डिसेंबरपर्यंत बेमोसमी पाऊस पडल्याने चालू वर्षी मार्चमध्ये काही गावांमध्ये व पाड्यांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून झरे, नाले आटले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाईस सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत पंचायत समितीकडील पाणीटंचाई विभागाकडे दांडीची बारी, मोरडा, जामनेमाळ या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींकडून पाठविण्यात आले होते. तेथील सोपस्कार पार पाडून टँकर मंजुरीसाठी सदर प्रस्ताव कळवण येथे उपविभागीय अधिकारी विकास मीना यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. येथून मंजुरी देण्यात आल्यावर तात्काळ टँकर सुरू करून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १४ कामांपैकी अहमदगव्हाण, बन पाडा, बोरगाव, चिखली, हिरड पाडा, मालगव्हाण व कोदरी, रोकड पाडा, साजोळे, उदयपूर व टेटपाडा, वावर पाडा या १० ठिकाणी कामे पूर्ण झाली असून कार्यान्वित आहेत, तर बुबळी, आंबाठा, पळसन, खडकमाळ या ४ ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २ कामे असून, भेगू येथील काम पूर्ण झाले आहे. अलंगुण येथील कामात प्रगती आहे. दरम्यान, खासदार निधीतून सुरगाणा येथील नूतन विद्यामंदिराजवळ पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत भोरमाळ, सावरीचा पाडा, रोकड पाडा, पातळी (खोकरी), उंबर पाडा (खो.), जामुणमाथा (खो.), निंबार पाडा (खो.), उंबरठा गायब (दिगर), उदमाळ, गोंदुणे, सुंदरबन (गोंदुणे), भाटविहीर, कुंभी पाडा, दोडी पाडा, म्हैसखडक, भवानदगड या १६ गावांची कामे प्रगतिपथावर आहेत. ३ टँकरचे प्रस्ताव१० राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत कामे पूर्ण४ कामे प्रगतिपथावर१ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत काम अपूर्ण 

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास