पर्यावरणपुरक गणेशाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:50 PM2018-09-19T17:50:34+5:302018-09-19T17:50:58+5:30
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या पाच दिवसांच्या पर्यावरणपुरक गणपतीचे वाजत गाजत विसर्जन शालेय आवारात उत्सवात करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली.
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या पाच दिवसांच्या पर्यावरणपुरक गणपतीचे वाजत गाजत विसर्जन शालेय आवारात उत्सवात करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली.गणेश उत्सव स्थापनेचे विद्यालयाचे हे पहिले वर्ष असून गणेशाची पर्यावरण पूरक आरास करण्यात आली होती.विद्यालयात झालेल्या कार्यशाळेत शाडूमातीपासुन विद्यालयाचे कलाशिक्षक के.व्ही.अहिरे यांनी श्री गणेशाची मूर्ती साकारली होती याच मूर्तीची स्थापना केली.यावेळी श्री गणेशाचे विसर्जन शालेय आवारात बनविलेल्या पाण्याच्या कुंडात प्रमुख पाहुणे राजेंद्र बाफणा व प्राचार्य सौ.संगिता बाफणा यांच्या हस्ते तर उपमुख्याध्यापक एस.यु.समदडिया ,विभाग प्रमुख सी.डी.निकुंभ , पर्यवेक्षक एम.टी.सोनी, आर.एम.पवार व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या समवेत संपन्न झाले, नंतर हे पाणी व माती झाडांना टाकण्यात आले. गणेशाची शाडूमाती मूर्तीत विविध वनस्पतीच्या बियांचा उपयोग करण्यात आला होता .त्यामुळे विसर्जनानंतर पाण्यामध्ये असलेली शाडूची माती व बिया रु जुन त्यापासुन रोपटी तयार होतील व त्यातुन पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल असा संदेश विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आला. तसेच या पाच दिवसांत जमा झालेले पुप्षहार ,फुले ,पत्री इत्यादी निर्माल्य कुंडात जमा केले होते ते ही विद्यालयाच्या परीसरातील झाडांना खत म्हणून टाकण्यात आले.