शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

पाच बंदिजनांनी बनविल्या गणरायाच्या पर्यावरणपूरक मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:19 AM

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच कैद्यांनी सुमारे १५० गणपतीच्या पर्यावरणपूरक सुबक मूर्ती बनविल्या असून,रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच कैद्यांनी सुमारे १५० गणपतीच्या पर्यावरणपूरक सुबक मूर्ती बनविल्या असून, त्यांच्यावर रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरविण्यात येत आहे.  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पनवेल जवळील पेण भागातील सागर भरत पवार हा एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. कळत-नकळत, चुकून रागाच्या भरात घडलेल्या घटनेमुळे कारागृहाच्या चार भिंतीत शिक्षा भोगावी लागते. त्यामध्ये अनेक जणांमध्ये विविध प्रकारचे कारागीर, कलाकार, साहित्यिक, लेखक असे गुण दडलेले आहेत. कैदी सागर पवार पेण भागातील असून मूर्तिकार आहे. त्याने कारागृह प्रशासनाकडे गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या मूर्ती बनविण्याची इच्छा प्रदर्शित केली.  कारागृह अधीक्षक राजकुमार साळी व इतर अधिकाऱ्यांनी कैदी सागर याला गणरायाच्या मूर्ती बनविण्यासाठी विविध प्रकारचा कच्चा माल उपलब्ध करून दिला. सागर याने कैदी चंद्रकांत सागवेकर, सखाराम बोले, विलास दिवे, अशोक भरत, गणेश सोनवणे या कैद्यांना गणपती मूर्ती बनविण्याबाबत मार्गदर्शन करत त्यांच्या मदतीने गणरायाच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. कारागृहातील साने गुरुजी कक्षात गेल्या दोन महिन्यांपासून कैदी सागर व त्यांचे इतर सहकारी अत्यंत भक्तिभावाने गणरायाच्या छोट्या-मोठ्या मूर्तींना आकार देत होते. जवळपास १५० पर्यावरणपूरक शाडू मातीतील छोट्या-मोठ्या सुबक मूर्ती तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटी व सजविण्याचे अखेरच्या टप्प्यातील काम सुरू आहे.