नूतन'मध्ये अवतरले इकोफ्रेंडली गणराय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 06:13 PM2020-08-22T18:13:08+5:302020-08-22T18:14:15+5:30

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये बुद्धीची देवता गणरायाची मंगलमय वातावरणात स्थापना झाली.

Ecofriendly Ganaraya incarnated in Nutan | नूतन'मध्ये अवतरले इकोफ्रेंडली गणराय

नूतन'मध्ये अवतरले इकोफ्रेंडली गणराय

Next
ठळक मुद्दे शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये बुद्धीची देवता गणरायाची मंगलमय वातावरणात स्थापना झाली. याहीवर्षी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शाळेने पुरोगामी विचारांचा वारसा जपत उपप्राचार्या मिनल होळकर यांचे हस्ते पारंपारिक पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली तर शाळेच्या सीबीएसई विभाग प्रमुख वैशाली कुलकर्णी व विशाखा केंगे यांनी पौरोहित्य केले.
यावेळी विद्यार्थी व पालकांना पर्यावरण पूरक शाडूच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाचे जागतिक महाआरोग्य संकट दूर व्हावे व बालगणेश भक्तांना शाळेची दारे पुन्हा खुली व्हावी यासाठी प्राथर्ना करण्यात आली. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर दहावीचे विद्यार्थी व सर्व शिक्षक गुगल मिट च्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झाले. आर्ट व क्राफ्टच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंच्या सहाय्याने आकर्षक सजावट करण्यात आली. याकामी कला विभाग प्रमुख मृणाल बकरे, चित्रा गिते व राधिका जाधव यांचे सहकार्य लाभले अशी माहिती शाळेचे प्राचार्य सत्तार शेख यांनी दिली. याकामी सिमा पवार, तुकाराम केदारे, अचर्ना कापसे, अर्शद शेख, पंकज दुर्वे, नुमान शेख, प्रणोती शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. 

Web Title: Ecofriendly Ganaraya incarnated in Nutan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.