शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

भाजपेतर नगरपंचायतींवर आर्थिक अन्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:00 AM

श्याम बागुल। नाशिक : नगरपंचायतींवर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहरी-ग्रामीण तोंडवळा असलेल्या नगरपंचायतींमध्ये आपला पाया घट्ट केल्यानंतर आता या पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतींवर योजनांची खैरात करून विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतींची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या म्हणीचा प्रत्यय यावा अशी ही परिस्थिती असून, यातून नाशिक जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतींना लाखोंची मदत करून बोळवण करतानाच, भाजपाच्या नगरपंचायतींवर कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुय्यम वागणूक : सत्ताधाºयांवर मात्र योजनांची खैरात

श्याम बागुल।नाशिक : नगरपंचायतींवर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहरी-ग्रामीण तोंडवळा असलेल्या नगरपंचायतींमध्ये आपला पाया घट्ट केल्यानंतर आता या पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतींवर योजनांची खैरात करून विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतींची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या म्हणीचा प्रत्यय यावा अशी ही परिस्थिती असून, यातून नाशिक जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतींना लाखोंची मदत करून बोळवण करतानाच, भाजपाच्या नगरपंचायतींवर कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.विशेष करून जिल्हास्तर नगरोत्थान योजना व दलित वस्ती सुधार योजना या जिल्हा पातळीवरून वितरित होणाºया निधीच्या बाबतीत हा प्रकार घडत असून, अलीकडेच झालेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीतदेखील विरोधी पक्षाच्या आमदारांनी नगरपंचायतींच्या होणाºया आर्थिक कोंडीबाबत प्रश्न उपस्थित करून ‘सर्वांना समान वागणूक द्या’ अशी मागणी करावी लागली होती. तथापि, राजकीय व शासकीय पातळीवरील आपले-परकेपणाची वाटचाल अद्यापही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्णातील पेठ, कळवण, दिंडोरी या तीन नगरपंचायतीविरोधी पक्षाच्या तर चांदवड, सुरगाणा, निफाड, देवळा या चार नगरपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. या नगरपंचायतींना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधी वाटप करताना सहजगत्या लक्षात यावी, अशा प्रकारे दुय्यम वागणूक देण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेपंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बहुतांशी सर्वच नगरपंचायतींनी या योजनेंतर्गत विविध विकासकामे करण्याचे एक ते दीड कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविले होते. प्रत्यक्षात भाजपेतर नगरपंचायतींवर अन्याय करताना त्यांना २५ ते ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून अन्य प्रस्तावांना केराची टोपली दाखविली गेली. तर भाजपाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतींना एक ते दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. असाच प्रकार नागरी दलित वस्ती योजनेंच्या बाबत असून, या योजनेंसाठी दाखल केलेल्या प्रस्तावांना मान्यता देताना जिल्हाधिकाºयांनी हात आखडता घेतला आहे. नगरोत्थान निधीच् निफाड- २२०.६५ लक्षच् देवळा- १८६.६२ लक्षच् कळवण- ५६.०० लक्षच् दिंडोरी- ३२.०० लक्षच् सुरगाणा- ०० लक्षच् चांदवड- ८९.७३ लक्षच् पेठ- २४.९९ लक्षदलितवस्ती योजनाच् निफाड- १४३.३८ लक्षच् देवळा- १३६.०० लक्षच् कळवण- ९२.८४ लक्षच् दिंडोरी- २१४.४७ लक्षच् सुरगाणा- प्रस्ताव नाहीच् चांदवड- ८२.६० लक्षच् पेठ- ५४.३९ लक्ष