खामखेडा : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून शेतीमाल तयार झाल्यावर तो बाहेरील राज्यात नेण्यासाठी व्यापारी येतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी असायचे, तेव्हा या अल्पशा पाण्यावर मार्च किंवा एप्रिल महिन्यात उन्हाळी टमाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथींबीर आदी पिकांची लागवड केली जायची. तेव्हा ती पिके साधारण जून किंवा जुलैत बाजारात विक्रीसाठी तयार व्हायची व मालेगाव, नाशिक, धुळे, नवापूर, सुरत आदी ठिकाणी विक्रीसाठी नेली जायची.बांधावर येऊन माल खरेदी बाहेरील व्यापारी थेट शेतकºयाचा बांधावर येऊन माल खरेदी करून रोख पैसे देऊन जायचे. त्या पैशातून शेतकºयाची मोठ्या प्रमाणात उलाढाल व्हायची व त्यातून शेतकरी खरीप हंगामातील पिकांसाठी बियाणे खत, मजुरी आदी भागवायचे.-----------------------याहीवर्षी परतीचा व अवकाळी पाऊस झाल्याने चालू वर्षी उन्हाळ्यात विहिरींना बºयापैकी पाणी होते. त्यामुळे खामखेडा परिसरातील शेतकºयांनी उन्हाळी मिरची, टमाटे, कोबी कोथींबीर आदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु दि. २२ मार्चपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी टप्याटप्याने लॉकडाऊन करावे लागले.आता खरीप हंगामातील पिकाची पेरणी झाली आहे. पिकाची कोळपणी व निंदणीही झाली आहे. पिके जोमात आहेत. त्यांना खतखाद्याची आवश्यकता आहे. परंतु यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकºयाला टमाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर आदी माल बाहेरील बाजारपेठेत विक्रीसाठी नेता आला नाही किंवा बाहेरील व्यापारी माल खरेदीसाठी शेतकरयांच्या बांधावर आले नाहीत. यामुळे शेतीमाल शेतातच विक्रीअभावी पडून राहिल. स्थानिक बाजारपेठेत मालाची आवक वाढल्याने तो कवडीमोल भावाने विकावा लागला. त्यामुळे खर्चही वसूल न झाल्याने आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 8:37 PM