मानोरी : चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवलेला मका स्वस्त दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कमी भावात मका विकून खर्चही निघत नसल्याने मका उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.कोरोनाने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले. परिणामी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याची मागणी घटली.पोल्ट्री व्यावसायिकांनी मका घेण्यास टाळल्याने बाजारातदेखील मक्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे. मका लागवडीनंतर लष्करी अळी व अवकाळी पावसामुळे मका पिकाचे अतोनात नुकसान झाल्यानंतर मक्याच्या उत्पादन क्षेत्रात मोठी घट निर्माण झाल्याने यंदा मक्याला चांगले दिवसयेतील अशी शेतकºयांना आशा लागली होती. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये सोंगणी झालेल्या मक्याला बाजारात चांगले दर मिळतील या अपेक्षेने सोंगूण ठेवलेली मका एप्रिल महिना संपत आलेला असतानादेखील शेतकºयांच्या खळ्यावर तशाच पडून आहे.मार्चपासून मक्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत गेले आणि कोरोनाने त्यात भर पडली. मक्याच्या भावात मोठी घसरण झाली. भाववाढीची अपेक्षेने सहा महिने राखून ठेवलेला मका अल्पदरात विकण्याची वेळ आल्याने शेतकºयांसमोर खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे.
मका उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 9:38 PM
मानोरी : चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवलेला मका स्वस्त दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कमी भावात मका विकून खर्चही निघत नसल्याने मका उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
ठळक मुद्देमका अल्पदरात विकण्याची वेळ