खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतातील खरिपाची पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.दर वर्षी शेतकºयांचे रब्बी हंगामातील पिकाचे नियोजन हे खरिपातील पिकाच्या येणाºया उत्पादनावर अवलंबून असते. रब्बी पिकाचे नियोजन हे खरीप पिके निघाल्यावर रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणजे उन्हाळी कांद्याची लागवड असते. शेतकºयांच्या दृष्टीने उन्हाळी कांद्याचे पीक फार महत्वाचे असते. कारण या कांद्याची विक्र ी करून येणाºया पैशातून त्याचे वर्षाचे आर्थिम नियोजन असते.परंतु चालू वर्षी खरिपाची पेरणी जरी उशिरा झाली असली तरी पिके जेमतेम पाण्यावर चांगली आली होते. लाल कांद्याची लागवडही झालेली होती. सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी खुश होता. लाल कांद्यालाही भाव राहील याची शेतकरी लाल कांद्याला पोटाच्या पोरा प्रमाणे काळजी घेत होता. शेतकºयांचे रब्बी पिकाचे सर्व नियोजन हे खरीप पिकातील मका व बाजरीची कापणी करून मका व बाजरीची काढून ती बाजारात विक्र ी करून त्याच्यातून येणाºया पैशातून त्याची उन्हाळी लागवड करण्याचा तयारी होता.उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी शेतकºयाने दोन वेळेस उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली. पहिल्या वेळेचे बियाणे टाकली आण िती नुकतीच उगलेली होती. परंतु जोरदार झालेल्या पाऊसामुळे ती दाबली गेली.तरीही शेतकºयाने हिंमत न हारता पुन्हा माहगडी अशी उन्हाळी कांद्याची बियाणे आणून टाकली होती.खरिपातील मका व बाजरी पिकाची काही शेतकºयांनी कापणी केलेली होती. तर काही शेतकरी कापणीचा तयारीत होते. परंतु अचानक अवकाळी पावसाने पंधरा दिवस जबरदस्त धुमाकूळ घातल्याने शेतात कापणी केलेल्या मका व बाजरीच्या कणीसांना अंकुर फुटले आणि जास्त दिवस शेताच पडून राहिल्याने दाणे काळे पडले. तसेच उभे असलेले पिके शेतात जास्त पाणी झाल्याने सडून गेली. काही शेतकºयाचा लाल कांदा काढणीसाठी तयार झाला होता. परंतु जास्त पाऊसामुळे तो शेतातच सडू लागला आहे.
अवकाळी पाऊसाने चुकले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 9:13 PM
खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतातील खरिपाची पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
ठळक मुद्देजास्त पाऊसामुळे तो शेतातच सडू लागला आहे.