लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला आहे.कोरोनाने कांद्याला घरगुती वापराशिवाय अद्यापही इतर व्यावसायिक मागणी नाही. त्यात वादळी पावसासह गारपिटीचाही कांद्याला फटका बसला. बाजार समित्याही चालू-बंद राहत असून, कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी, सुल्तानी संकटाने कांदा उत्पादक हतबल झाला आहे.नैसर्गिक मागणी कमी झाल्याने बाजार समितीतही कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविलेला आहे. साठविलेल्या कांद्याला वादळी पावसासह गारपिटीचाही फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजला, परिणामी मोठे नुकसान झाले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिली आणि कर्नाटकचा कांदा बाजारात आला तर आहे, त्या कांद्यालाही दर मिळतील याची शाश्वती नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. लॉकडाऊनचा परिणामयंदा कोरोना महामारीने शेतकºयांच्या कोणत्याच शेतमालाला अपेक्षित दर मिळालेला नाही. कोरोनाकाळात जगण्याची धडपड करीत शेतकरी अर्थार्जनासाठी रस्त्यावर आला, मात्र यातूनही खर्च फिटेल इतकेही उत्पन्न बळीराजाला मिळाले नाही. लॉकडाऊनच्या फटक्यातून अजूनही शेतकरीवर्ग सावरलेला नाही. सध्या अनलॉक टप्पा सुरू असला तरी, सर्वच छोट्या-मोठ्या शहरातील हॉटेल्स, ढाबे बंद आहेत, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झालेली नाही. बाजार समित्याही चालू-बंद राहत आहेत. परिणामी कांद्याला घरगुती वापराशिवाय मागणीच नाही.
विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:02 PM
येवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला आहे.
ठळक मुद्देयेवला : नाफेडच्या खरेदीबाबत असलेल्या उदासीन धोरणाचा बसला फटका