निफाड : केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांसाठी निफाड तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी झाले होते. संपाला निफाड तालुक्यातून प्रतिसाद मिळाल्याचा दावा माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय गिते यांनी केला.वैनतेय विद्यालयात झालेल्या सभेनंतर शिवाजी निरगुडे, रवींद्र मोरे, चंद्रकांत कुशारे, रामराव बनकर, भीमराज काळे, बाबा गुंजाळ, बी. आर. सोनवणे आदिंनी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी के. के. निकम, जालिंदर कडाळे, बाळकृष्ण ठोके, दिलीप कुंभार्डे, डी. बी. वाघ, रवींद्र कर्वे, एस. एम. सोनवणे, तुकाराम तलवारे, सी. आर. जाधव, के.एस. चौधरी, भूषण सोनवणे, एस. एस. सूर्यवंशी, मुकुंद जाधव, सोमनाथ मत्सागर, केशव तासकर, सी. डी. रोटे, डी. जी. जाधव, आर. आर. शिंदे, किशोर दरेकर, रतन वडघुले, दिवाकर शेजवळ, भारती लंबाते, एस. जी. बाप्ते, मनीषा गुजराथी, एस. एन. पटेल, एस. एस. कापसे, संगीता चौधरी, मीनाक्षी पवार, वैशाली गवळी, रंजना लाहोटी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
निफाड तालुक्यात संपात शिक्षक सहभागी
By admin | Published: September 02, 2016 10:02 PM