येवला : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्र वारी मंत्रालयात जाऊन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन अनुदान वितरित करण्याबाबत होत असलेल्या दप्तर दिरंगाईची माहिती पुराव्यासह सादर केल्याने शिक्षणमंत्री व्यवस्थेवर संतप्त झाले. तावडे यांनी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण व शिक्षण संचालक नामदेव जरग यांना फोनवरून बोलताना, शिक्षण विभाग करीत असलेल्या चाल-ढकलीबाबत तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. तसेच दोन आठवड्यांच्या आत अनुदान प्रत्येक शाळेला मिळाले पाहिजे, असे सांगितले. १६२८ शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन्स बसविल्या आहेत. पावती आणि फोटो तसेच २०१५-१६ संचमान्यता आणि पोर्टलमधील माहिती पाहून अनुदान द्यायचे असताना जाचक अटी का घालता, अशी विचारणाही त्यांनी केली. (वार्ताहर)
लालफितीच्या कारभाराविरोधात शिक्षणमंत्री झाले आक्र मक
By admin | Published: February 12, 2017 10:33 PM