शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

शिक्षण विभागातील  अधिकाऱ्यांकडूनच बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:04 AM

आपल्या निकटवर्तीयांसाठी सोयीच्या बदल्या मिळाव्यात यासाठी आणि चुकीची माहिती भरून शासनाची फसवणूक करणा-या शिक्षकांना वाचविण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिका-यांनीच बनवाबनवी केल्याचा संशय असून, सुनावणी दरम्यान यातील काहींना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दोषीदेखील धरल्याचे समजते.

नाशिक : आपल्या निकटवर्तीयांसाठी सोयीच्या बदल्या मिळाव्यात यासाठी आणि चुकीची माहिती भरून शासनाची फसवणूक करणा-या शिक्षकांना वाचविण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिका-यांनीच बनवाबनवी केल्याचा संशय असून, सुनावणी दरम्यान यातील काहींना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दोषीदेखील धरल्याचे समजते. एकीकडे शिक्षकांनी खोटी माहिती भरून निर्माण केलेला गोंधळ पारदर्शकपणे मिटविण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे काही अधिकारी दोषी शिक्षकांना वाचविण्यासाठी उपाययोजना करीत असल्याचे बोलले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना अंधारात ठेवून यातील अनेकांना यापूर्वीच क्लीन चिटदेखील मिळाल्याचे समजते.  शिक्षक बदल्यांच्या आॅनलाइन पोर्टलवर माहिती भरताना ज्या शिक्षकांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना शिक्षण विभागातील काही अधिकाºयांनी मार्गदर्शन केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे. पोर्टलवर गावे निवडताना निवडलेली गावे पुन्हा दिसत असल्याने आणि ३० किलोमीटरच्या पुढचे अंतर गूगल मॅपिंगवर यावे यासाठी दूरवरच्या गावांची माहिती भरण्यामध्येदेखील काही अधिकाºयांनी शिक्षकांना मार्गदर्शन केल्यामुळेच मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, असा आरोप होत असतानाही कोणत्याही अधिकाºयांची मात्र अद्यापही चौकशी करण्यात आलेली नाही. आपल्या पत्नीसाठी संवर्ग-२ मध्ये काही गटशिक्षणधिकारी, गटविकास अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाºयांनी माहितीचा गोंधळ घालून संपूर्ण यंत्रणेचीच दिशाभूल केली आहे. याचमुळे संबंधितांची बिटात बदली होणे अपेक्षित असताना त्यांनी सोयीच्या दृष्टीने नाशिक शहरात बदल्या करवून घेतल्या आहेत. दुसरी बाब म्हणजे बदलीचा लाभ घेण्यासाठी शासकीय सेवेतील पती-पत्नी कायम आस्थापनेवर असेल तर त्यांना बदलीचा लाभ मिळणार असतानाही अनेकांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये नोकरीला असल्याचे दाखवून जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे. चुकीची माहिती भरलेल्या सर्वांचीच गूगल मॅपिंगद्वारे सरल प्रणालीमधील अंतराची पडताळणी करण्यातच आली नसून केवळ चर्चेतून संबंधितांच्या अर्जावर निर्णय घेण्यात आले आहेत.पक्षघात किंवा मेंदूचा आजार झाला असल्याची अनेक प्रकरणे बदलीसाठी आलेली आहेत; मात्र त्यांनी शस्त्रक्रियेचा किंवा उपचाराचा जो कालावधी दाखविला आहे त्या कालावधीत संबंधित शिक्षक वैद्यकीय रजेवर होता का याचीदेखील पडताळणी करण्यात आलेली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे काही शिक्षकांनी तर आपल्या मुलांनाच मतिमंद असल्याची प्रमाणपत्रे सादर करून बदलीचा लाभ पदरात पाडून घेतला आहे. याची कोणतीही पडताळणी करण्यास जिल्हा परिषदेला अपयश आलेले आहे. या सर्व प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दाट संशय उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. चौकशीच्या फेºयात असलेल्याना क्लीन चिट देण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी पार पाडत आहेत का? अशी शंकादेखील निर्माण झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना यासाठी यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे. ग्रामविकास राज्यमंत्र्यांनीही सुचविला तोडगाचुकीचे अंतर दाखवून बदली मिळविल्याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गूगल मॅपिंग आणि इवदच्या अधिकाºयांकडून सोयीनुसार अंतर मोजणीचा वापर केला जात आहे. यातून चौकशी पारदर्शक होत नसल्याचा संशय काही शिक्षकांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर त्यांनी ३० किलोमीटरचे अंतर मोजणीची सत्यता एसटी महामंडळाकडून करून घेतली पाहिजे, असा तोडगा सुचविला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद