शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

शिक्षण, समाज व्यवहारात माणुसकी हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:43 AM

अनुदानित, विनाअनुदानित, तासिकापद्धती, शिक्षणसेवक अशा विविध पद्धतीत शिक्षकांची वर्गवारी करून त्यांचे वेतन रोजंदारी कामगारांपेक्षाही कमी करण्यात आले असल्याचे सांगतानाच शिक्षण आणि समाज व्यवहारात माणुसकी हरवली असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.

नाशिक : अनुदानित, विनाअनुदानित, तासिकापद्धती, शिक्षणसेवक अशा विविध पद्धतीत शिक्षकांची वर्गवारी करून त्यांचे वेतन रोजंदारी कामगारांपेक्षाही कमी करण्यात आले असल्याचे सांगतानाच शिक्षण आणि समाज व्यवहारात माणुसकी हरवली असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालय नाशिक व नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित आदर्श शिक्षक गौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख, सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्यवाह अभिजित बगदे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, किशोर पाठक, भानुदास शौचे आदी उपस्थित होते. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संगीत क्षेत्रातील अलका देव मारुलकर, क्रीडा विभागातील मोनिका आथरे व व्यावसायिक विभागात धनंजय बंगाळ या विशेष पुरस्कारार्थींसह प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व सेवानिवृत्त शिक्षकांना विविध पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात शिक्षण देऊन रुजवलेली शिक्षण प्रणाली आजचा व्यावहारिक समाज आणि शासन मुळापासून उपटू पाहत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसेच बदलत्या काळानुरूप शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ज्ञानदानाचे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. रमेश देशमुख यांनी प्रास्ताविक, तर अमृता कवीशकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता बाफना यांनी आभार मानले.पुरस्कारार्थी शिक्षकपुरस्कारार्थींमध्ये रोहिदास गोसावी, श्रीकृष्ण आवारे, पूनम मीरचंदानी, विद्या पाटील, डॉ. डी. एस. अहेर या प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिक विभागातील डॉ. गजानन आंभोरे, माधुरी देशपांडे, शोभा आरोटे, सुनीता बुरकुले यांचा समावेश आहे, तर उच्च माध्यमिक विभागात प्रा. स्वाती शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयीन विभागात डॉ. मंजूषा कुलकर्णी, रमेश वरखेडे, सुचिता पाटील यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा विभागात मीनाक्षी गवळी, कला विभागात विद्या देशपांडे, शास्त्रीय संगीत विभागात विद्या ओक यांनाही पुरस्काराने गौैरविण्यात आले. सेवानिवृत्तांमध्ये दिनेश म्हात्रे, चंद्रकांत जामदार, प्रा. विजय भट, मिलिंद चिंधडे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.