शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:17 PM

नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष बागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाणसह नजिकच्या परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मागील आठ दिवसात रशियात १५ कंटनेर द्राक्षांची निर्यात झाल्याचे समजते.जिल्हयात सप्टेंबर आणि आॅक्टोबर ...

ठळक मुद्दे७० कंटेनर निर्यातहंगामात सहा हजार कंटेनरच्या निर्यातीची अपेक्षारशिया, मलेशिया निर्यात सुरू

नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष बागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाणसह नजिकच्या परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मागील आठ दिवसात रशियात १५ कंटनेर द्राक्षांची निर्यात झाल्याचे समजते.जिल्हयात सप्टेंबर आणि आॅक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्याचे चित्र होते. मात्र नंतर हवामान चांगल राहील्याने निर्यातक्षम द्राक्षबागांना त्याचा फायदाच झाला. आॅक्टोबर नंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था होती. मध्यंतरी अचानक ढगाळ हवामान होवून पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यात झाल्या होत्या. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण समजू शकले नव्हते. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असल्याुमळे द्राक्षांवर रोगाचा पार्द्रुभाव होवू नये, म्हणून शेतकºयांना द्राक्ष बागांमध्ये धूर व किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजर १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्ट तसेच चांदवड तालुक्यात ३ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागातील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. यावर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांची आतापर्यंत १५ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात होवू शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकुण या हंगामात ७० ते ८० द्राक्ष कंटेनरची निर्यात झाली आहे.