नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाच्या राष्टय उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले. आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकु लात बुधवारी (दि.२९) आयोजित व्याख्यानात ‘मोदीनॉमिक्स... आर्थिक दृष्टिकोनातील स्थित्यंतर’ या विषयावर गोविलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लघुउद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय महाजन, निमाचे हरिशंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी गोविलकर यांनी ‘मोदीनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा सादर करताना देशाची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, १९७७-१९९१ या कालखंडात सरकार स्थिर न राहिल्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झाले. देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले. २००८ साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी लोकांची क्रयशक्ती वाढवावी, सरकारने खर्च करावा, असा पर्याय सुचविला. तो आजतागायत लागू आहे. असे यावेळी गोविलकर यांनी सांगितले.अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भर२०१४ पासून आजपर्यंत राष्टÑीय अर्थव्यवस्था अधिक विकसित करण्यावर या सरकारने भर दिला. शेतीच्या तीन प्रश्नांपैकी उत्पादनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. याप्रसंगी बोलताना गोविलकर यांनी सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.
आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी : विनायक गोविलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:07 AM