शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

कोरोनावर पारंपरिक औषधांनीही प्रभावी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 10:48 PM

नाशिक - कोरोना संसर्ग झाला की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरून जातात आणि तत्काळ रुग्णालयाचा शोध सुरू करतात. मात्र भावनावश न होता योग्य पद्धतीने निदान करून उपचाराची दिशा ठरवा. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीतही यावर अनेक उपचार आहेत. त्यांचाही वापर करून घ्यावा. अचूक उपचार झाल्यास कोणत्याही प्रकारे धावपळ न करताही रुग्ण बरे होऊ शकतात, असे मत नाशिकमधील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मत : न घाबरता सामना केल्यास बरे होणे शक्य

नाशिक - कोरोना संसर्ग झाला की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरून जातात आणि तत्काळ रुग्णालयाचा शोध सुरू करतात. मात्र भावनावश न होता योग्य पद्धतीने निदान करून उपचाराची दिशा ठरवा. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीतही यावर अनेक उपचार आहेत. त्यांचाही वापर करून घ्यावा. अचूक उपचार झाल्यास कोणत्याही प्रकारे धावपळ न करताही रुग्ण बरे होऊ शकतात, असे मत नाशिकमधील तज्ज्ञांनी व्यक्त केले.शहरात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी मुळातच दक्षता घ्यावी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासह संसर्ग होऊ नये यासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या उपचार पद्धतीचे पालन करावे यासाठी आग्रही असून त्या संदर्भात गुरुवारी तज्ज्ञांसमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ही माहिती तज्ज्ञांनी दिली. कोरोना संसर्ग झाल्यानंतर बेड मिळण्यापासून औषध आणि उपचाराच्या अनेक समस्या उदभवतात. त्यातही महापालिकेसारखी यंत्रणा संपूर्ण क्षमतेनिशी झटत असली तरी त्यांनाही मर्यादा आहेत; त्यामुळेच संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले.मुळात कोणत्याही चिकित्सा प्रणालीशी कोणाचीही स्पर्धा नाही. मात्र सहजसुलभ पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि उपचाराचे प्रयत्न असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. सचिन पाटील यांनी पतंजलीविषयी असलेल्या गैरसमजांचे खंडन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.कोरोना संसर्ग झाला की लगेचच रुग्णाला घाबरवून सोडल्यास त्याच्यावरील तणाव वाढतो. त्याचा श्वसनावर तसेच फुप्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे न घाबरता परिस्थितीला सामोरे जा. होमिओपॅथीतदेखील कोरोनावर उपचार करता येतात; तसेच त्यातून रुग्णदेखील बरे होतात. गेल्या वर्षी असेर्निक अल्बमच्या गोळ्या लाखो लोकांनी घेतल्या. त्यांनादेखील त्याचा फायदा झाला.- डॉ. आशर शेख, होमिओपॅथी तज्ज्ञपूर्वदक्षता (प्रिव्हेंशन), हायरिस्क, कोविड पॉझिटिव्ह आणि पोस्ट कोविड असे या संदर्भातील चार टप्पे आहेत. होमिओपॅथीत त्याचे उपचार असून त्यातील डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेतल्यानंतर फुप्फुसातील संसर्ग कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ९८ टक्के प्रकरणांत रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो.- डॉ. योगेश धोंगडे, होमिओपॅथी तज्ज्ञउन्हाळा असल्याने थंड पदार्थांकडे ओढा असला तरी आइस्क्रीम, शीतपेये यासारख्या पदार्थांमुळे घशात अत्यंत थंड होते आणि ते कोरोनासारख्या विषाणूला पोषक ठरते; त्यामुळे या काळात फ्रिज डिस्टन्सिंगदेखील केले पाहिजे. जलनेती नियमित केल्यास संसर्ग टळू शकतो. त्यामुळे ती नियमितपणे केली पाहिजे.- डॉ. अभिनव मुठे, आयुर्वेदाचार्यकोरोना उपचाराबद्दल माझे संशोधन झाले आहे. संसर्ग झाल्यानंतर ताप आल्यास तो तत्काळ कमी होण्यासाठी गोळ्या-औषधे घेतली जातात. तसे न करता तापाचे सुयोग्य नियमन केले पाहिजे. होमिओपॅथीत हेच केले जाते. अत्यंत साध्या उपचाराने कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे.- डॉ. फराज मोतीवाला, होमिओपॅथ तज्ज्ञसदोष श्वसन हे खरे आजाराचे मूळ असून त्यामुळे फुप्फुसाचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे योग्य श्वसनाबरोबरच प्राणायाम आणि कपालभाती नियमित करणे आवश्यक आहे.- राज सिन्नरकर, योगतज्ज्ञ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल