शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

निवडणूक दक्षता : बंदोबस्ताला ४०० केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 7:50 PM

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघपोलिसांकडून सशस्त्र पथसंचलन

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे एकूण ४०० जवानदेखील निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लवकरच शहरात येणार असल्याची माहित्री सूत्रांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रांचे मिळून सुमारे १ हजार १५४ बूथ आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. या सर्व बूथनिहाय पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापसांत चर्चा करून देण्यात आलेला बंदोबस्त तैनात करणार आहेत. निवडणुकीचे मतदान शहरात सर्वच केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. सर्वाधिक संवेदनशील केंद्रे भद्रकाली व पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असून, या भागात पोलिसांकडून सशस्त्र पथसंचलनदेखील केले जात आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था नियमानुसार आयुक्तालयाकडून करण्यात आली असून, बंदोबस्तासाठी त्यांना अतिरिक्त वाहनेही पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.असा असेल बंदोबस्त२५४ इमारतींमधील केंद्रांच्या १ हजार १५४ बूथवर ७३५ पोलीस शिपाई, ५७७ होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. याव्यतिरिक्त निवडणूक काळात व प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सहा उपआयुक्त, १९ सहायक आयुक्त, ७० पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १९८ पुरुष शिपाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई ३ हजार, ७०० होमगार्ड असा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019