भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेची चर्चा चालू आहे. त्या दृष्टीने आयमाने मोठ्या उद्योगांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी सीएसआर फंड उपलब्ध करण्याबाबत आवाहन केले आहे तसेच छोटे व मध्यम उद्योगांकडून ५०० ते १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आवाहन केले आहे. त्यासाठी एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव व ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध झालेले आहे. तरी सर्व उद्योजकांनी आपापल्या परीने या सामाजिक कार्यासाठी जास्तीत जास्त पद्धतीने मदत करावी. असे आवाहन आयमातर्फे करण्यात आले आहे. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी आयमाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. निखिल पांचाळ यांनी आयमा करीत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, राजेंद्र अहिरे, सुरेश माळी आदी उपस्थित होते.
चौकट..
मदतीसाठी हात पुढे
उद्योजक राजेंद्र कोठावदे यांनी ऑक्सिजन प्लांट टाकण्याचे आश्वासन दिले. के. एल. राठी यांनी १० कॉन्सन्ट्रेटरसाठी धनादेश दिला. जयंत जोगळेकर यांनी ५, यतिन पटेल यानी २, इंजिनिअर शशिकांत पाटील यांनी २, आशिष नहार यांनी १ कॉन्सन्ट्रेटर तसेच सी. एस. सिंग यांनी ऑक्सिजन लिक्विड प्लांट टाकण्याचे आश्वासन दिले.