शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

व्यापाऱ्यांना पॅकेज देण्यासाठी प्रयत्न :दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:13 PM

नाशिक : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संकटातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना उभारी मिळावी म्हणून करप्रणालीत शिथिलता आणावी, पतपुरवठ्यामध्ये लवचीकता आणून भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि वीज बिले ही व्यावसायिकऐवजी औद्योगिक दराने आकारावीत, अशा प्रमुख मागण्या केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत झालेल्या झूम क्लाउड मिटिंगमध्ये मांडण्यात आल्या.

नाशिक : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संकटातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना उभारी मिळावी म्हणून करप्रणालीत शिथिलता आणावी, पतपुरवठ्यामध्ये लवचीकता आणून भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि वीज बिले ही व्यावसायिकऐवजी औद्योगिक दराने आकारावीत, अशा प्रमुख मागण्या केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत झालेल्या झूम क्लाउड मिटिंगमध्ये मांडण्यात आल्या. ‘यावेळी मांडण्यात आलेल्या बहुतांश मागण्या रास्त असून, सरकारमधील वरिष्ठांपर्यंत पोहोचवून व्यापारीवर्गाला दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दानवे यांनी दिले.महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधील व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी व मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. त्यात नाशिक सिटिझन्स फोरमचे अध्यक्ष शहेमंत राठी आणि संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा यांच्यासह मानसिंग पवार (औरंगाबाद) अरुण दांडेकर (सांगली) यांच्यासह अन्य ज्येष्ठ व्यापारी प्रतिनिधींचा समावेश होता.यावेळी राठी यांनी ‘सद्यस्थितीतून सावरण्यासाठी व्यापाºयांना अवधी आणि सवलती अशा दोहोंची गरज आहे. म्हणूनच खेळत्या भांडवलासाठी क्रेडीट लिमिट हे २५ टक्क्यांपर्यंत वाढवून द्यावे. व्यापाºयाला करण्यात आलेल्या पतपुरवठ्याचे व्याजदर कमी करावेत आणि परतफेडीसाठी वर्षभराची मुदत ठरवून द्यावी.’ लॉकडाउनबाबत केंद्रीय, राज्य आणि स्थानिक अशा विविध स्तरांवरून दिल्या जाणाºया निर्देशांमुळे व्यापाºयांचा गोंधळ उडत असून, या निर्देशांमध्ये स्पष्टता आणि एकवाक्यता असावी, अशीही मागणी केली, तर विक्रम सारडा यांनी ‘जीएसटी अदा करण्यासाठीची मुदत सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात यावी.

टॅग्स :Nashikनाशिक