मानोरी : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकरी वर्गाने शेती व्यवसायाला जोडून भाजीपाला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात असतानाच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी आप्पा गोधडे यांनी देखील पन्नास हजार रुपये खर्चून आपल्या शेतात वांग्याचे भरघोस उत्पादन घेतले, मात्र या वांग्यांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून साधा उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाल्याने गोधडे यांनी बैंगळ वांगी शेतातच तोडून टाकून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दोन महिन्यांपूर्वी कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रोपांची वानवा भासत असल्याने आप्पा गोधडे यांनी पर्याय म्हणून आपल्या २० गुंठे शेतीची मशागत करून एक्सपोर्ट क्वालिटी वाणाच्या वांग्याच्या रोपांची निवड करून लागवड केली. २० गुंठ्यासाठी सुमारे १५०० वांग्याची रोपे खरेदी केली. लागवड करते वेळी पाण्याची शास्वती नसल्याने मल्चिंग पेपरचे आच्छादन करून दोन फूट अंतरावर वांगे लावण्यात आले. वातावरणात बदल होत असताना देखिल गोधडे यांनी सातत्याने वांग्यांवर औषध फवारणी करून वांग्याची रोपे जागवली होती.दरम्यान मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून वांगे तोडण्यास सुरुवात केल्यानंतर वांगे बाजारात विक्रीसाठी नेले असता सुरुवातीला वांग्याच्या प्रति एक क्रेट्सला ५० ते ७० रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र आज ना उद्या आपल्या वांग्यांना चांगला भाव मिळेल अशी शास्वती असताना वांगे देखील दर्जेदार असल्याने चांगले उत्पादन निघाले मात्र भावात सातत्याने घसरण सुरुच राहिली. लासलगाव, विंचूर, येवला, पाटोदा, मुखेड आदींसह आठवडे बाजारसह मुख्य बाजारात वांग्याच्या प्रति क्रेटसला २० रुपयांपासून भाव मिळू लागल्याने गोधडे यांना झालेला खर्च भरून निघणे देखील यातून दुरापास्त झाले असून त्यांनी 20 गुंठे वांग्यासाठी पन्नास हजार रुपये खर्चून केवळ पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्न निघाले असल्याने झालेला खर्च फिटणार कसा ? या चिंतेतते सापले आहे.कांदा लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याने मी माझ्या २० गुंठे शेतात वांगे लावले होते. वांग्याला ५० हजार रुपये खर्च केल्यानंतर मागील काही दिवसांपासून वांगे बाजारात विक्रीसाठी नेत असून बाजारात एका क्रेटसला २० रुपये भाव मिळत असल्याने यातून माझा साधा उत्पादन खर्च देखील फिटणार नाही.- आप्पा गोधडे, शेतकरी, पिंपळगाव लेप.
कवडीमोल दरामुळे शेतातच तोडून टाकली वांगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 7:11 PM
मानोरी : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकरी वर्गाने शेती व्यवसायाला जोडून भाजीपाला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात असतानाच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी आप्पा गोधडे यांनी देखील पन्नास हजार रुपये खर्चून आपल्या शेतात वांग्याचे भरघोस उत्पादन घेतले, मात्र या वांग्यांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून साधा उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाल्याने गोधडे यांनी बैंगळ वांगी शेतातच तोडून टाकून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देवांगी शेतातच तोडून टाकून देत तीव्र नाराजी व्यक्त केली