चौकट-
१) कोणत्या भाजीला काय भाव
भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव
वांगी - १५ ४०
टमाटा - ७.५० २०
भेंडी - १२.५० २५
हिरवी मिरची - ४० ६०
गवार - २५ ४०
काकडी - १० २०
पालक - ३ १०
कोथिंबिर १८ २५
मेथी - १७ २०
पत्ताकोबी - ४.१० १० (नग)
फ्लॉवर - ७.८५ २०
दोडके - १०.४० ३०
गिलके - १६.६० ३०
चौकट-
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
कोट-
मोठ्या अपेक्षेने सिमला मिरचीची लागवड केली होती. पण त्याला मिळालेला भाव पाहता खर्च जाऊन हाती काहीही शिल्लक राहिले नाही. उलट भाजीपाला पिकविला म्हणून डोक्यावर कर्ज वाढले आहे.
- राहुल ठोंबरे, शेतकरी
कोट-
भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे फ्लॉवर उत्पादनाचा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. बियाण्यापासून लागवडीपर्यंत आणि त्यानंतर काढणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. याशिवाय वाहतूक खर्च वेगळा याचा विचार केला तर सहा आणि सात रुपये किलोने फ्लॉवर विकली गेली तर काय मिळणार याचा विचार व्हायला हवा
- संभाजी पगारे, शेतकरी
चौकट-
ग्राहकांना परवडेना
कोट-
थोड्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी घाऊक बाजारात जाणे परवडत नाही. यामुळे दारावर येणारा विक्रेता किंवा जवळच्या बाजारात जाऊन भाज्या घ्याव्या लागतात. हे विक्रेते दहा रुपये पावशेरच्या खाली कोणतीही भाजी देत नाहीत. पण भाज्या घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने मिळेल त्या दरात त्या घ्याव्याच लागतात
- पौर्णिमा पगारे, गृहिणी
कोट-
कोरोनाच्या संकटात पगार कमी झाले आहेत. त्यात पेट्रोल, डाळींचे दर वाढले आहेत. पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त होत असला तरी आमच्यासारख्या ग्राहकांना मात्र तो स्वस्तात मिळत नाही. ही स्वस्ताई केवळ विक्रेत्यांसाठीच आहे की काय असा प्रश्न पडतो. परवडत नसले तरी भाजी घ्यावीच लागते
- योगेश जाधव, ग्राहक
चौकट-
भावात एवढा फरक का?
शेतकरी क्विंटलने विकत असले तरी आम्हांला आता पाव, पावशेरने माल विकावा लागतो. बाजार समितीतून माल आणताना त्याचा वाहतूक खर्च करावा लागतो. याशिवाय जागाभाडे आणि आमचा नफा यांचा विचार केला तर या दराने भाजीपाला विकला तरच आमच्या पदरात दोन पैसे पडतात.
- अनिल पुणे, भाजी विक्रेता.